वाढदिवसाला जाणाऱ्या मित्रांच्या कारला भीषण अपघात ; दोन ठार, एक गंभीर जखमी

0

संगमनेर : वाढदिवसाला जाणाऱ्या तीन मित्रांच्या कारला नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर हिवरगाव पावसा टोल नाक्या नजीक भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. सदरची घटना मंगळवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.

      अभिषेक साहेबराव रहाणे (वय२९) रा. चंदनापुरी ता.संगमनेर, प्रथमेश विकास कुरकुटे (वय२३) रा.कुरकुटवाडी, बोटा, ता. संगमनेर अशी या भीषण अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे असून विजय तबाजी काळे (वय३५) रा.पावबाकी रस्ता, संगमनेर हे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.  हे तिघे मित्र आपल्या कार मधून वाढदिवसासाठी मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून चंदनापुरी कडून  संगमनेरच्या दिशेने येत होते. त्यांची कार हिवरगाव पावसा टोल नाक्या नजीक असणाऱ्या उड्डाण पुलावरून जात असताना कारने अगोदर डिव्हायडरला जोराची धडक दिली. त्यानंतर ही कार डिव्हायडर तोडून उड्डाण पुलावरून पुलाच्या खाली असणाऱ्या रस्त्यावर कोसळली. त्यानंतर कारने तीन-चार जोराच्या पलट्या खाल्या. त्यामुळे कारमधील हे तिघेही मित्र गंभीर जखमी झाले. त्यांना सुरुवातीला संगमनेरातील खाजगी रुग्णालयात औषधोपचारासाठी हलवण्यात आले. मात्र जास्त रक्तस्त्राव झाल्याने अभिषेक राहणे आणि प्रथमेश कुरकुटे या दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी असलेल्या विजय काळे या तरुणाला नाशिकला हलविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here