बुलडाणा प्रतिनिधी : छत्रपती संभाजी नगर येथे काही समाज कंटकांनी कर्तव्यावर असणाऱ्या एसटी वाहक आणि चालकाला केलेल्या मारहाणीचा बुलडाणा एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांनी निषेध केला . यावेळी निषेध व्यक्त करण्यासाठी जमा झालेल्या वाहक चालक आणि कर्मचारी या घटनेचा निषेध व्यक्त करीत म्हणाले की दिनांक १२ नोव्हेंबरला छत्रपती संभाजी नगरला काही व्यक्तीने चालक वाहकाला मारहाण केली. एसटी वाहक चालकांबाबत या अशा घटना सतत घडत आहे. याला कोठे तरी आळा बसला पाहिजे.
या असल्या घटना घडू नयेत म्हणून शासनाने कडक पाऊले उचलावी . तसेच त्या व्यक्तीवर गुन्हा नोदवून त्यांना कडाक शिक्षा व्हावी . तसेच कर्मचाऱ्यांना शासनाने सुरक्षितता देली पाहिजे. अशी मागणी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यानी केली . तसेच या घटनेच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. या वेळी आगारातील दिपक मिसाळकर भारत आरख दीपक निकम प्रदीप सरकटे एस एस कुंनर , डोईफोडे, माधुरी सुरडकर , सागर सोनोने, जुमडे , भाकडे , चिंचोले , सलीम खान , ,शेळके, विजू खंडारे , खंभयतकर, कायांदे व इतर कर्मचारी हजर होते.