विंधणे (खालचा पाडा) रक्तदान शिबिरात ४७ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

0

उरण दि ४(विठ्ठल ममताबादे 🙂सामाजिक कार्यकर्ते तथा साईभक्त धनराज पाटील यांनी राज्यातील थॅलेसेमिया रुग्णांची रक्ताची अडचण दूर करण्याच्या उद्देशाने सामाजिक बांधिलकी म्हणून आयोजित केलेल्या रक्तदाब  शिबिरात ४७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.या शिबिराचे उदघाटन  स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विनोद सदाशिव साबळे यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी ज्वालासिंह देशमुख स्वराज्य संघटना करंजाडे,अतिष साबळे ग्रामपंचायत सदस्य, कुणाल जाधव, नितीन ओंबळे, गणेश पोशा कोळी, भगवान म्हात्रे, विंधणे खालचा पाडा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष कृष्णा कोळी, जयराम पाटील,केतन पाटील, विनोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी आपल्या मनोगतातून बोलताना विनोद साबळे म्हणाले की, विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी विज्ञान रक्ताची निर्मिती अजून करू शकले नाही, त्यामुळे धनराज पाटील चा आदर्श घेऊन सर्व तरुणांनी रक्तदान करण्यास पुढे यावे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनराज पाटील, निवास पाटील सुनिल वर्तक, सुनील पाटील,अमित पाटील,अनुज पाटील,यश पाटील, मिलिंद पाटील आणि धनराजच्या परिवाराने विशेष मेहनत घेतली.कार्यक्रमाचे दिवसभराचे निवेदन, सुप्रसिद्ध निवेदक सुनिल वर्तक, जीवन डाकी आणि दिपक पाटील यांनी केले.एकंदरीत सदर रक्तदान शिबीर मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here