पाताळेश्वर विद्यालयात कलागुणांचा आणि विद्यार्थी गुणगौरवाचा कार्यक्रम संपन्न
सिन्नर : पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय समितीचे चेअरमन चंद्रभान नामदेव रेवगडे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी रेवगडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर आपल्यामधील विविध गुण व छंद जोपासले पाहिजे ,विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व वैविध्यपूर्ण तयार झाले पाहिजे.अंधश्रध्देपासून दूर राहून वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासला पाहिजे .
यावेळी वर्षभरामध्ये विविध स्पर्धा परीक्षा,एस.एस.सी.गुणवंत विद्यार्थी,क्रिडा,विविध उपक्रम,विज्ञान प्रदर्शन,राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळलेले विद्यार्थी,यामध्ये वर्षभरात विविध उपक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव व पारितोषिक वितरण करण्यात आले.सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी बालनाटके,एकांकीका,मुकाभिनय,कोळीनृत्य,लावणी ,पोवाडे,चित्रपट गिते,रिमिक्स गिते,देशभक्तीपर गिते,अहिराणी गिते,शेतकरी गिते,सामाजिक गीत गायन असे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम उत्साहाने सादर केले. यात अंधश्रद्धा आधारित नाटक अंगात आलंय देवापुढे ११ रुपये ठेव या सारखी अंधश्रद्धा निर्मुलन आधारित नाटके सादर केली.यात पूनम बोगीर,वैष्णवी जाधव,नितांषु शिंदे,संकेत रेवगडे,तनुजा रेवगडे,प्रतिक्षा रेवगडे,वैष्णवी जाधव,वैष्णवी पाटोळे,तेजस्विनी जाधव,जानव्ही रेवगडे,हर्षदा पाटोळे,दर्शन वारुंगसे,मानसी पाटोळे,कावेरी रेवगडे,पुजा पोटे,अक्षदा जाधव,ऋतुजा रेवगडे,शुभांगी पाटोळे,या विद्यार्थ्यांनी दर्जेदार गीते सादर केले.विद्यालयाच्या विविध सहशालेय उपक्रमांचे पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी केले.सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास,जिद्द,चिकाटी,संघ भावना,जिज्ञासा, कुतूहल,प्रसंगावधान, सादरीकरण क्षमता,अभिनय कौशल्य आदि गुण विकसित होतात याची जाणीव पालकांना करून दिली.
बाल विज्ञान विकास शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष टी.एस.ढोली यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमांतुन संस्था व विद्यालय नियमित प्रयत्नशील असते . यावेळी संस्थेचे सहसचिव अरुणभाऊ गरगटे,कोषाध्यक्ष टी.के.रेवगडे,संचालिका मनीषा रेवगडे, थोर देणगीदार अशोक घुले,पाडळी गावचे उपसरपंच सुरेखा बोगीर,निर्मला रेवगडे,इंदुबाई पाटोळे,भगिरथ रेवगडे, धनंजय रेवगडे,दिपकशेठ पाटोळे,दगडू शिंदे,सुभाष जाधव,भास्कर बोगीर,कचरू नाना पाटोळे . नाना रामभाऊ पाटोळे,तानाजी रेवगडे उपस्थित होते.
विद्यालयातील शिक्षक बी.आर. चव्हाण,आर.व्ही.निकम,एस.एम.कोटकर, आर.टी. गिरी, एम.सी.शिंगोटे,श्रीमती एम.एम.शेख,सौ सविता देशमुख, टी.के.रेवगडे, श्रीमती सी.बी. शिंदे, के.डी.गांगुर्डे,एस. डी.पाटोळे, आर.एस.ढोली, ए.बी.थोरे हे उपस्थित होते.
Home महाराष्ट्र विद्यार्थ्यांनी कलागुणांसोबत अंधश्रध्देपासून दूर राहून वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासला पाहिजे : नामदेव रेवगडे