.सिन्नर: पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी मध्ये राजमाता जिजाऊ जयंती ,युवा दिन तथा स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच पाडळीचे भूमिपुत्र भारताचे माजी केंद्रीय कृषिमंत्री डॉ . आण्णासाहेब शिंदे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे माजी गुणवंत विद्यार्थी व डॉ . आण्णासाहेब शिंदे ज्युनियर कॉलेज ठाणगावचे प्रा . शरद रेवगडे उपस्थित होते
प्रथम व्यासपीठावरील मान्यवर व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले प्रमुख अतिथी प्रा . शरद रेवगडे यांनी विद्यार्थ्यांना अगदी मोजक्या शब्दांमध्ये मार्गदर्शन केले त्यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्यापासून एक तरी आदर्श गुण घ्यावा व तो कायम जोपासावा असे सांगितले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस बी देशमुख होते त्यांनी हरित व धवल क्रांतीचे प्रणेते व स्वतंत्रसेनानी डॉ . आण्णासाहेब शिंदे यांचा जीवनपट आपल्या अध्यक्षीय भाषणातून स्पष्ट केला प्रतिकूल परिस्थितीवर मात करून भारताचे केंद्रीय कृषिमंत्री म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली . जिद्द, चिकाटी व प्रयत्न असेल तर महत्वपूर्ण कामे यशस्वी होतात असे ते म्हणाले .
तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, डॉ. आण्णासाहेब शिंदे यांच्या जीवनावर भाषणे, पोवाडे ,वंदन गीते सादर केली .श्याम रेवगडे व मानसी पाटोळे यांनी जिजाऊ वंदन गीत सादर केले तसेच प्रतीक्षा शिंदे ,रोहित रेवगडे, श्रुती जाधव ,ऋतुजा पाटोळे ,शुभम जाधव ,आयुष शिंदे, मयूर पाटील, तन्वी पाटोळे ,ईश्वरी पाटोळे ,कार्तिक चव्हाण ,अविनाश रेवगडे, साहिल रेवगडे ,अंकिता कडाळे, अनुजा रेवगडे ,श्रावणी रेवगडे ,कीर्ती कडाळे, अनुज शिंदे, मानसी पाटोळे ,वैष्णवी शिंदे ,अंजली पाटोळे ,निशाद नरड, श्याम रेवगडे, प्रतीक्षा पाटोळे ,रितेश रेवगडे, साहिल नवले ,सुजल शिंदे, शिवम रेवगडे, अनिकेत रेवगडे, समीक्षा वाजे ,तृप्ती पाटोळे या विद्यार्थ्यांनी भाषणे केली प्रास्ताविक चव्हाण बी आर यांनी केले तर आभार रेवगडे टि के यांनी मानले.
यावेळी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक टी.के. रेवगडे ,बी आर चव्हाण, आर व्ही निकम, एस एम कोटकर, एम सी शिंगोटे, एम एम शेख, सविता देशमुख, सी बी शिंदे, के डी गांगुर्डे, एस डी पाटोळे ,आर एस ढोली ,ए पी थोरे हे उपस्थित होते .