समाज बांधवांसह महायुतीतील पधिकारी यांनी उपस्थितीत राहावे : राजू गोरे, एकनाथ धमने
नवीन नांदेड : महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे दि १३ एप्रिल रोजी सकाळी ११ वा मातोश्री मंगल कार्यालय येथे धनगर समाज बांधव व महायुतीतील सर्व पक्षांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन संदर्भात दि २८ मार्च रोजी मातोश्री मंगल कार्यालय येथे आढावा बैठक घेऊन पुढील रूप रेषा ठरवण्यात आली असून त्याच्या दौऱ्याची जय्यत तयारी झाली असल्याचे मत मा नगरसेवक राजू गोरे . एकनाथ धमने . पांडूरंग काकडे . गंगाप्रसाद काकडे आदींनी सांगितले .
या कार्यक्रमाच्या उदघाटक पालकमंत्री आतुल सावे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण . हे असतील तर प्रमुख उपस्थिती शिवसेनेचे उपनेते तथा विधान परिषेदेचे आ हेमंत पाटील . राष्ट्रवादी कॉग्रेस चे आ प्रताप पाटील चिखलीकर . आ आनंदराव बोंढारकर . आ बालाजी कल्याणकर . यांच्या सह सर्व महायुतीतील आजी माजी आमदार सर्व जिल्हाप्रमुख सह सर्व पदअधिकारी यांची प्रमूख उपस्थिती राहणार असल्याची माहिती देण्यात आली असून या संदर्भातील दि २८ रोजी मातोश्री मंगल कार्यालय कौठा येथे आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीस भाजपाचे एकनाथ धमने . मा नगसेवक राजू गोरे . पांडूरंग काकडे . माजी जिप सदस्य चंद्रसेन पाटील . मा जि प सदस्य गंगाप्रसाद काकडे . छत्रपती कानोडे . शिवसेना ओबिसी जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने . बबनराव वाघमारे .नागोराव शेंडगे . डॉ सोन्नर . अशोक कडबे . तुकाराम लुटे . देविदास हराळे . गोविंदराव गोरे . डॉ शिवाजी गोरे . नागोराव बारसे . सुरेश काळे . बळीराम काळे आदींच्या उपस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त यांची पुढील कार्यक्रमा संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली .