वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता पगारवाढ कराराची घोषणा

0

नगर –  राज्यातील तीनही वीज कंपन्यातील वीज कर्मचारी अधिकारी अभियंते यांची दिनांक 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2028 पर्यंत चा पगार वाढ करा प्रलंबित होता. याबाबत व्यवस्थापन व वीज कर्मचारी संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत पगारवाढ संबंधी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री यांनी विज कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनात 19%  वाढ तर सर्व भत्त्यांमध्ये 25% वाढीची तसेच वीज कंपन्यातील सर्व सहायकांच्या मानधनामध्ये रुपये 5000/-  वाढीची घोषणा केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहीरोद्दीन यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

     यावेळी राज्याच्या नवनियुक्त मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक व अप्पर मुख्य सचिव, ऊर्जा श्रीमती अभा शुक्ला तीनही वीज कंपन्यांचे सी.एम.डी. श्री.लोकेश चंद्र, डॉ.पी.अन्बलगन, डॉ. संजीव कुमार, संघटनेच्या वतीने केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे, सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन, कार्यकारी अध्यक्ष आर.पी.थोरात, उपाध्यक्ष ताराचंद कोल्हे, बी.डी. पाटील, एस पी शाहीर, विष्णू घोडके यांची उपस्थिती होती.

     या संदर्भात संघटनेची भूमिका मांडताना सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन यांनी सांगितले की, संघटनांच्या वतीने दिलेला 22.5 टक्के मूळ वेतन वाढ वाढ व सर्व भत्त्यात 100 टक्के वाढीची मागणी साठी आग्रह धरला तसेच मागील 2018 ते 23 च्या पगार वाढ करारा प्रसंगी वर्ग 4मधील लाईन स्टाफ कामगारांना रुपये 500/- दिलेले अ‍ॅडॉकची रक्कम फक्त वर वर्ग 4 च्या कर्मचार्‍यांना न ठेवता वर्ग 3 मधील तांत्रिक कामगारांनाही लागू करा अशी मागणी केली. यावर उपमुख्यमंत्री यांनी संघटनांचा 22.5% चा प्रस्ताव मान्य न करता 19 टक्के वाढ व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ जाहीर केली मात्र संघटनेची दुसरी मागणी जी रुपये 500 अ‍ॅडॉक दिले होते ते 1000 करून वर्ग तीन व चारच्या कर्मचार्‍यांना लागू करण्याची मागणी मान्य केली, संघटनेने पुन्हा हे दिलेले 1000 रुपये ची वाढ कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनात द्यावी अशी मागणी केली असता त्या मागणीस नकार देत संघटनेच्या मागणीनुसारच ही वाढ वर्गच्या 3च्या कर्मचार्‍यांनाही लागू केल्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले.

     तांत्रिक कामगारांच्या अनॉमली त्यात तांत्रिक कामगारांची स्वतंत्र वेतन श्रेणी, यंत्रचालकांच्या सामान्य आदेशातील तफावत, यंत्र चालकांना पदोन्नतीचे चैनल निर्माण करणे यासाठी ठराविक डेडलाईन देऊन हे प्रश्‍न निकाली काढण्यात यावे यावरही उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मकता दर्शवली. पगारवाढ करार सोमवार किंवा मंगळवारी होण्याची शक्यता आहे.

     पगारवाढ कराची घोषणा केल्यानंतर संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या वतीने सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन व केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे यांनी सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here