वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत नचिकेत ढेरे यांनी आपला जन्मदिवस केला साजरा !!

0

उरण दि २९(विठ्ठल ममताबादे ) सामाजिक कार्याची आवड आणि निवड हि माणसाच्या अंगिकृत स्वभावातून निर्माण होते आणि हे कार्य करण्याकरीता कुठलीही वेळ-काळ पहिली जातं नाही,तर मनातली प्रबळ ईच्छाशक्तीच या क्षणांनां निर्माण करते आणि अश्याच सोनेरी क्षणांना एका सामाजिक आणि प्रेरणादायी कार्यानं सजवलं ते म्हणजेच सामाजिक कार्यकर्ते नचिकेत ढेरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत त्यांच्या  आई सामाजिक कार्यकर्त्या रायगड भूषण संगीता ढेरे  आणि त्यांचे वडील सचिन ढेरे या दांम्पत्याच्या अंगी असलेली सामाजिक बांधिलकीची नाळ ही सदैव त्यांना  समाजपयोगी कार्य करण्याची प्रेरणा देतं असत आणि त्याच प्रेरणेतून प्रेरित होऊन, सामाजिक बांधिलकी जपतं पुन्हा एकदा एक अनोखं सामाजिक कार्य पार पडलं ते संगिता  ढेरे आणि सचीन ढेरे या दांपत्याने पनवेल नेरे  भानघर येथील वृद्धाश्रमातील आजी  – आजोबांना  जीवनावश्यक सामान आणि फळांचे व खाऊचे वाटप करून नचिकेत ढेरे यांचा जन्मदिवस साजरा केला.

नचिकेत याचा जन्मदिवस आजी – आजोबांच्या  व शाळेतील लहान मुलांच्या सोबतीने त्यांना जीवनावश्यक वस्तू आणि  फळांचे व खाऊंचे वाटप करून साजरा करण्यात आला.अश्या प्रेरणादायी कार्याने समाज्यापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. 

       या आदर्शवत आणि प्रेरणादायी कार्यक्रम प्रसंगी केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक रायगड भूषण राजू मुंबईकर ,श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता संस्थेच्या अध्यक्षा संगीता ढेरे , सचिन ढेरे आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष रायगड भूषण  भारत भोपी,वेश्वी गावचे सामाजिक कार्यकर्ते  प्रविण कडू,नचीकेतचे आजोबा छबुराव ढेरे, आत्या योगिनी चौधरी,रामदास चौधरी, मित्र धीरज रावल, अंशू अग्रवाल, करूणेश्वर वृद्धाश्रमातील करुणा ढोरे,ईश्वर ढोरे आणि वृद्धाश्रमातील आजी – आजोबा आदी मान्यवर उपस्थित होते.हा अनोखा आणि प्रेरणादायी कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here