सातारा : जिल्ह्यात भारतीय बौद्ध महासभेचे कार्य चालु आहे.तेव्हा नवनिर्वाचित कार्यकारिणीने नाव-नवनवीन वैविध्यपूर्ण असे उपक्रम राबवुन अधिकाधिक धम्मकार्य कार्य करावे.असे आवाहन ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते विलासराव कांबळे यांनी केले.
जिल्हा भारतीय बौद्ध महासभेची नुकतीच नवनिर्वाचित कार्यकारीणी जाहीर झाली होती.येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ विविध संघटनांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला.तेव्हा कांबळे मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी धम्मबांधव उत्सव कमिटीचे अध्यक्ष शामराव बनसोडे होते.या अगोदर सर्वांचा सत्कार महाविहार व सांस्कृतिक भवन (मिलिंद कॉलनी) येथे झालेलाच आहे.त्यामुळे तिसरा सत्कार झाल्याचे आपसूकच हॅटट्रिक साधली आहे.
यावेळी ज्येष्ट मार्गदर्शक वामन मस्के, प्राचार्य रमेश जाधव, आर. आर.गायकवाड,रमेश इंजेआदींनी पदाधिकारी यांच्यासह महासभेचा गौरवशाली इतिहास कथन केला.प्रारंभी,डॉ.आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार बाळासाहेब जाधव,अशोक बनसोडे,प्राचार्य रमेश जाधव व वामन मस्के यांनी अर्पण करून अभिवादन केले. जिल्ह्यातील एकमेव भन्ते दिंपकरजी यांच्या हस्ते पूर्व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव व जिल्हा पश्चिम संस्कार विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार काळे यांचा सत्कार करण्यात आला.संपूर्ण विधी भन्ते यांच्याच अधिपत्याखाली पार पाडण्यात आला. धम्मबांधव उत्सव कमिटीचे संस्थापक अनिल वीर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.सदरच्या कार्यक्रमास रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,गणेश भिसे,प.जिल्हाध्यक्ष विशाल भोसले,पाटण तालुकाध्यक्ष सचिन कांबळे,मनोज कांबळे, रमेश गायकवाड,ऍड.विलास वहागाकर,महादेव मोरे,शाहिर श्रीरंग रणदिवे,बी.एल.माने, रामचंद्र गायकवाड,कु.श्रद्धा गायकवाड आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते,उपासक- उपासिका उपस्थित होत्या.
फोटो : बाळासाहेब जाधव व नंदकुमार काळे यांचा सत्कार करताना भन्ते दिंपकरजी शेजारी मान्यवर.