सातारा : भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष व्ही.आर. थोरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली धम्माचे काम नियोजनपद्धतीने अश्वगतीने चाललेले आहे. म्हणूनच त्यांच्या कार्याची दखल घेऊन बंधुत्व पुरस्कार नुकताच मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
बंधुत्व प्रतिष्ठानतर्फे जाहीर केलेला बंधुत्व पुरस्कार येथील सुरभी सभागृहात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानिका, ‘भगवान गौतम बुद्ध आणी त्यांचा धम्म’ हा ग्रंथ, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, शाल आदी होते.
गेली २५ वर्षे धम्म कार्यात कार्यरत असणारे असामान्य व्यक्तिमत्व, निवृत्त असिस्टंट कमिशनर सेंट्रल एक्साइज, भारतीय बौद्ध महासभेचे माजी राष्ट्रीय सचिव, जिल्हाध्यक्ष व्ही.आर. थोरवडेसाहेब यांनी केलेल्या प्रदीर्घ धम्म कार्याविषयी व त्यांच्या समाजसेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अमृतमहोत्सवी सोहळ्यात वितरण करण्यात आले. कानाकोपऱ्यात सर्व धम्मबांधव हे साहेबांना आपुलकीने आणि मार्गदर्शक म्हणून ओळखतात. त्यांच्या धम्मकार्यामुळे सर्वजण त्यांच्याकडे आकर्षित होतात. १९९७ साली थोरवडेसाहेबांनी तन-मन-धनाने धम्मकार्यात उडी घेतली.सातारा जिल्ह्याच्यावतीने सन १९९९ पासून लिंबूनी, बुद्धगया, नालंदा, कुशीनगर अशा अनेक बुद्धांच्या धम्म परिषदा आयोजित केल्या होत्या. आपल्या सहनशील,संयमी, जिल्हास्तरीय महावीर साकारले.यापूर्वी त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. सन २०२०-२१ चा बंधुत्व प्रतिष्ठानचा, “बंधुत्व धम्मरत्न” हा सुवर्णमहोत्सवी वर्षांतील पुरस्कार ऍड.भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले होते.तरीही महत्वपूर्ण असा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अनोखी अशी भेट संस्थापक अनिल वीर यांनी देऊन दुग्धशर्करा योग जुळवून आणला. याशिवाय, बंधुत्व जीवनगौरव पुरस्कार नाथा ममता आगाणे (काका), केंद्रीय शिक्षक भागवत भोसले, यशवंत अडसुळे (आप्पा) व दिलीप फणसे यांनाही प्रदान करण्यात आले.जिल्ह्यात धम्म प्रचार-प्रसार आघाडीवर करणारे दोन शिलेदार यांना बंधुत्व धम्म प्रचार-प्रसार पुरस्कारही गवई यांच्याच हस्ते जिल्हा महासचिव विद्याधर गायकवाड व जिल्हा उपाध्यक्ष अरविंद उत्तम बारसिंग यांना देण्यात आले.बंधुत्व समाज – धम्मरत्न पुरस्कार तारळे महासभेचे विभागाध्यक्ष तथा सोसायटीचे संचालक भानुदास सावंत व सातारा तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने यांनाही गौरविण्यात आले.या सर्वांचा गौरव राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवईसाहेब यांच्या हस्ते करण्यात आला.राष्ट्रोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष ऍड.हौसेरावं धुमाळ यांनी स्वागत केले.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेचे किशोर दरफडे यांनी सूत्रसंचालन व सन्मानपत्राचे वाचन केले. धम्मबांधव उत्सव कमिटीचे उपाध्यक्ष प्रा.विलास वहागावकर यांनी आभार मानले.सदरच्या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर,विविध संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व महासभेचे राष्ट्रीय, राज्य,जिल्हा व तालुका पदाधिकारी,समता सैनिक दल सैनिक,श्रामनेर, उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.
फोटो : व्ही.आर.थोरवडे यांना बंधुत्व पुरस्कार प्रदान करताना जगदीश गवई,मध्यभागी अनिल वीर शेजारी पदाधिकारी श्रामनेर.