शरद पवार मेथीच्या लाडूसारखे तर राज ठाकरे शंकरपाळे वाटतात :सुषमा अंधारे

0

मुंबई : “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मेथीच्या लाडूसारखे राजकारणात पौष्टिक आहेत. उद्धव ठाकरे हे चौकोनी नानकटाई सारखे गोड आहेत,” असे उद्गार शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काढले आहेत. एबीपी माझा’शी बोलताना त्यांनी हे उद्गार काढले.

शंकरपाळे पाहिल्यानंतर मला राज ठाकरे यांची आठवण येते. देवेंद्र फडणवीस गुलाबजाम सारखे गोड गोड आणि गुळगुळीत बोलतात. धनंजय मुंडे यांना त्यांनी बाहेरून कडक आणि आतून नरम असलेल्या अनारशाची उपमा दिली. यावेळी अंधारे यांनी त्यांच्या संघर्षमय प्रवासाबद्दलही सांगितले.

राजकारणात नारायण राणे हे फटाक्यातल्या दिशाहीन रॉकेट सारखे असून उद्धव ठाकरे हे बॉम्ब असल्याचं त्या म्हणाल्या. फटाक्याची लड म्हणजे शिवसैनिक असून तुडतुड करणाऱ्या छोटे फटाके म्हणजे नारायण राणेंची दोन मुलं असल्याचं म्हणत त्यांनी फटाक्यातल्या झाडाची उपमा दिली.

नवनीत राणा यांचा सुषमा यांनी उल्लेख गोल गोल आणि काटेरी दिसणाऱ्या चकली म्हणून केला. सुषमा अंधारे सध्या बीडच्या परळीमध्ये आपल्या माहेरी आल्या असून त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा फराळ तयार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here