सातारा : येथील राजवाडा परिसरातील गोलबाग अर्थात, कमला नेहरू उद्यानात दि.२३ मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा होणार आहे.तेव्हा पालिकेने सहकार्य करावे. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.
‘शहीद दिन’ म्हणून देशभर साजरा करण्यात येतो. या दिवशी शहीद भगतसिंग,राजगुरु व सुखदेव यांनी देशासाठी बलिदान दिलेले आहे. त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याचा विचार दिलेला आहे. देश स्वातंत्र्याची प्रेरणा बनले आहे.त्या हौतात्म्याला अभिवादन करण्याचा दिवस आहे.या दिवशी शहीद भगतसिंग स्मृती समितीमार्फत शहर परिसर तसेच कमला नेहरू उद्यान येथे सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत शहीदांना आदरांजलीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.तेव्हा पालिकेतर्फे पुढीलप्रमाणे सहकार्य करावे.

गोल बागेच्या चारी बाजूस शहिदांचे फोटो/ पोस्टर लावून मिळावेत. विद्युत रोषणाई, स्पीकर व्यवस्था,लोकांना बसण्यासाठी सतरंजी वैगरेची व्यवस्था करण्यात यावी. छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) तसेच शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या फोटोला पुष्पहार उपलब्ध करून देणे. शहरात चार ते पाच ठिकाणी अभिवादनपर मोठे पलेक्स लावून मिळावेत.अशाप्रकारे उपमुख्यकार्यकारी अधिकारी दामले यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. यावेळी कॉ. किरण माने,शिरीष जंगम, परवेश सय्यद,श्रीकांत कांबळे,विनायक आफळे, अरबाज शेख,सलीम आतार, ऍड.विलास वहागावकर,अनिल वीर आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.