पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात गुड टच बॅड टच कार्यशाळा संपन्न
सिन्नर : मुलींना व मुलांना आपल्या विशिष्ट वयात मनात होणारा गोंधळ दूर करायचा असेल तर आपल्या पालकांशी संवाद साधा व भोवतालच्या परिस्थितीशी सामना करायला शिका. आपले संरक्षक कवच आपले आई वडील, त्यानंतर शाळेत आपल्या मनातील भीती दूर करून ज्ञानाचा वसा पूर्ण करणारे गुरु जन यांच्या नेहमी सानिध्यात रहा. विचार व निर्णय घेण्याची क्षमता आपल्या स्वतःमध्ये निर्माण करा म्हणजे आजूबाजूचे शत्रू आपल्यावर हल्ला करणार नाहीत. असा सल्ला सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिला येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात गुड टच बॅड टच कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती . यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते .
ते पुढे म्हणाले की सद्य परिस्थितीत आजूबाजूला घडणाऱ्या घटना व त्याचा होणारा विपरीत परिणाम दूर करून मुलींच्या मनातील भीती बाजूला सारून त्यांना धैर्यशील बनविण्यासाठी मोबाईल सारख्या मनाला भावून टाकणारे साधन दूर ठेवा. हळूहळू आपण त्याच्या आहारी जाऊन वेगवेगळे गुन्हे घडतात. कळत नकळत आपण अनेक बाबींना सामोरे जाऊन कायद्याचे उल्लंघन करतो हे लक्षात ठेवा.पोलीस हा आपला मित्रच आहे. आपली बाजू त्यांच्या समोर मांडा. आयुष्य खूप मोठे आहे. त्याचा उपयोग खूप मोठे होण्यासाठी करा. असा मोलाचा सल्ला पो.नि. गायकवाड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला
यावेळी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी आज आपण रोज वर्तमानपत्रातून झळकणाऱ्या बातम्या वाचून आपल्या मनामध्ये गोंधळाचे काहूर माजते. यासाठी आपण आपल्या मनाची तयारी करून या गोष्टींपासून दूर जावे असा संदेश दिला. यावेळी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष टी. के. रेवगडे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून आपल्या शाळेची घडत गेलेली प्रगती व त्यात विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग यामुळे आज आपण सर्वजण पुढे आहोत. याच बरोबर मुलांनी आज भोवताली असलेल्या वेगवेगळ्या प्रलोभनांना बळी न पडता आपले आयुष्य खूप सुंदर जगा असा मोलाचा संदेश दिला. किरण शिंदे यांनी आपल्या आजूबाजू घडणाऱ्या घटना व रोज मुलींच्या संदर्भात ऐकू येणाऱ्या बातम्या यांचा विचार करून गायकवाड यांना निमंत्रित करून मुलींना मार्गदर्शन करावे असे सुचविले. पाडळी गावचे पोलीस पाटील गणेश रेवगडे व आशापुर च्या पोलीस पाटील भाग्यश्री पाटोळे यांनी मुलांची मनातील भीती दूर करून त्यांना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण त्यांना संरक्षणाचे धडे देण्याचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचे सांगितले. गावच्या प्रथम नागरिक सुरेखा रेवगडे यांनी मुले व मुली यांनी बाजूला घडणाऱ्या घटनांचा आपल्या मनावरती विपरीत परिणाम न करता चंचल असणारे मन ताब्यात ठेवून आयुष्याला वेगळे वळण द्या असे सांगितले. या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख अतिथी अंकुश दराडे पोलीस हेडकॉन्स्टेबल गुप्तचर विभाग यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शालेय समितीचे चेअरमन चंद्रभान रेवगडे, शाळा व्यवस्थापन समितीचे धनंजय रेवगडे उपस्थित होते. तसेच मान्यवरांनी विद्यालयातील नुकत्याच विभागीय पातळीवर टेनिक्वाईट या खेळामध्ये गलेल्या संघातील विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षिका एम. एम. शेख यांचा सत्कार केला. यावेळी ईश्वरी शिंदे व सार्थक सहाने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सविता देशमुख यांनी केले. आभार आर.व्ही. निकम यांनी मानले. उपशिक्षक बी. आर. चव्हाण, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, ए. बी. थोरे उपस्थित होते.