सिन्नर : सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघाने बोलवलेल्या शिक्षक दरबारात जुनी पेन्शन योजना , शिक्षकेत्तर कर्मचारी भरती , १० ,२० ,३० ची आश्वाशित प्रगत योजना , वेतनेत्तर अनुदान, शिक्षक मान्यता, शालार्थ आय .डी ,अटॅच,डीटॅच मेडीकल बीलांसह रजा रोखीकरण व फरकबीले , डी एड टु बी एड वेतनश्रेणी ह्या समस्या प्रास्ताविकेतुन मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.बी. देशमुख यांनी मांडल्या. यावर नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे MLA Kishor Darade यांनी यातील काही प्रश्न नागपुर अधिवेशनात मांडणार असून काही प्रश्न या महिना अखेर सोडवण्याचे आश्वासन दिले. तसेच आमदार किशोर दराडे यांच्या विकास निधीतून तालुक्यातील ४० शाळांना संगणक संच देण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हॉल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिक्षक आमदार किशोर दराडे व एस.बी. देशमुख यांच्या हस्ते शाळांना अत्याधुनिक संगणक संच भेट देण्यात आले.
याप्रसंगी आमदार किशोर दराडे यांनी मागील साडेपाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. या आधी तालुक्यातील शाळांना आमदार दराडे यांच्या निधीतून प्रिंटर तसेच पुस्तक संच भेट देण्यात आले होते. जुनी पेंशन योजना कार्यान्वित व्हावी यासाठी आपण शेवटच्या क्षणापर्यंत लढणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. शिक्षकांना देण्यात आलेली शाळाबाह्य कामे त्वरित बंद करण्यात यावी, जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत व्हावे, वेतन पथकाकडे प्रलंबित असलेले बिले, आगामी अधिवेशनात राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आश्वासित प्रगत योजनेचा प्रश्न* *निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी सर्वप्रथम १२ व २४वर्षाची वेतनश्रेणी लागू होणे महत्त्वाचे असल्याचे, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार संपला पाहिजे यासाठी शिक्षक दरबार भरविण्याचा निर्धार केलेला असून, नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
या व अशा अनेक प्रश्नांना मार्गी लावणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. प्रास्ताविक एस .बी .देशमुख यांने केले. एम .डी .काळे यांनी मनोगत व्यक्त केले. तर रामनाथ लोंढे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी एस. जी. सोनवणे, एस. टी. पांगरकर, श्रीमती राजगुरू मॅडम, जमिर सैय्यद, सलीम चौधरी, शिवाजी गाडेकर, संजय जाधव, महेश बर्के, रविंद्र गिरी, आर. डी. जाधव मिलिंद खैरणार, काठे मॅडम संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते