सिन्नर : पाडळी गावच्या योगेश रघुनाथ जाधव यांच्या भाची कुमारी शितल त्र्यंबक वाजे यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्या निमित्त पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी यांच्यावातिने सत्कार करण्यात आला . त्यांनी स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करून आपल्या डुबेरे गावचे व एका सामान्य कुटुंबाचे नांव झळकवले. टी.आर.वाजे (हॉटेल न्यु.वैष्णवी,संचालक) यांची कन्या शितलने आपले प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागात पूर्ण करून पुढील पदवीचे शिक्षण सिन्नर महाविद्यालयात पूर्ण करून आपल्या कुटुंबाची परिस्थितीची जान ठेवत व वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करून पी.एस. आय.होण्याचे स्वप्न पूर्ण केले. मला माझ्या या क्षेत्रातील उच्चस्थ पदापर्यंत पोहचण्याची इच्छा प्रकट केली. मुलींनी उच्च शिक्षण पूर्ण करून वेग-वेगळ्या क्षेत्रात आपले स्थान निश्चित करावे. यासाठी अंगी जिद्द,चिकाटी,मेहनत व अभ्यासाची योग्य तयारी ठेवा असे सांगितले.
बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी मुलींनी शितलचा आदर्श घेऊन आपल्या कुटुंबापासून दूर राहून आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करा व त्यापर्यंत पोहचण्यासाठी यशाचा मार्ग निश्चित करा.प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून जीवनात यशस्वी होतो तो खरा ध्येयवादी असे सांगितले.
या सत्कार समारंभ प्रसंगी त्यांचे बंधू गणेश पोपट जाधव (वृत्त संकलक दूरदर्शन) यांनी आमच्या* *बहिणीच्या यशाचे वाटेकरी आपण सर्वजण आहात असे सांगितले. चेतन वाजे,डॉ.प्रतिक्षा पाटील,बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक टी.के. रेवगडे,बी.आर.चव्हाण, आर.व्ही. निकम,एस.एम.कोटकर, आर.टी.गिरी,एम.एम.शेख, एस.एस.देशमुख, सी.बी.शिंदे, के.डी. गांगुर्डे,एस.डी.पाटोळे,आर.एस.ढोली,ए.बी.थोरे उपस्थित होते.