मुंबई : अफजलखानाचा कोथळा बाहेर काढलेली बहुप्रतिक्षित छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली वाघनखं मुंबईत दाखल झालेली आहे. त्यामुळे वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे.
१९ जुलै रोजी राज्यशासनाच्या सातारा येथील संग्रहालयात ही वाघनखे प्रदर्शनाकरता ठेवण्यात येणार आहेत.
लंडनमधील ‘व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअम’ मध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राज्य शासनाने सातत्याने प्रयत्न केले होते. याशिवाय या वाघनखांवरून वादही निर्माण झाला होता. इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी ही वाघनखे शिवरायांची नसल्याचे वक्तव्य केले होते.
मात्र, मुनगंटीवारांनी अधिवेशनात त्यांचा हा दावा खोडून काढत ही वाघनखं शिवरायांचीच असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता ही वाघनखे मुंबईत दाखल झाली आहेत. १९ जुलै तारखेला सातारा येथील संग्रहालयात ही वाघनखे प्रदर्शनाकरता ठेवण्यात येणार आहेत.