तडीपार मोर्चा द्वारे सरकारच्या हुकूमशाहीचा, दडपशाहीचा केला निषेध.
उरण दि 19(विठ्ठल ममताबादे )
विद्यमान सरकार हुकूमशाही द्वारे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांवर विविध अत्याचार, जुलूम करत आहे. खोटे केसेस शिवसैनिकांवर दाखल केले जात आहेत.शिवसैनिकांना तडीपारचे आदेश काढले जात आहेत. त्यांच्यावर ईडी, इनकमटॅक्सची कारवाई हेतूपरस्पर केली जात आहे. खोटे केसेस करून शिवसैनिकांना त्रास दिले जात आहे. मात्र सरकारच्या या हुकूमशाहीला, दडपशाहिला शिवसैनिक अजिबात घाबरणार नाही. सरकारच्या हुकूमशाहीला, दडपशाहिला शिवसेना अजिबात भिक घालणार नाही. कोणावरही अन्याय झाल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्याच्या नेहमी पाठीशी उभी राहील, शिवसैनिकांनो तुम्ही घाबरू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी बेलापूर येथे केले.
सध्याचे राज्य सरकारने सूडाच्या भावनेत शिवसैनिकांवर अत्याचार सुरु केले आहेत.सरकार विरूद्ध बोलेल त्याला पोलीसी खाक्या दाखवणं ,धमक्या देणे ,तडीपार करणे अशा अन्यायकारक गोष्टी सुरू केल्या आहेत. म्हणूनच पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना उरण विधानसभा तर्फे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे) दिनांक 19 ऑक्टोबर 2022 रोजी सि पी ऑफिस,बेलापूर, नवी मुंबई येथे सकाळी 11वाजता विद्यमान सरकारच्या हुकूमशाही व मनमानी कारभाराचा निषेध करत सरकार विरोधात ‘तडीपार मोर्चा’ काढण्यात आला होता यावेळी भास्कर जाधव बोलत होते.
यावेळी शिवसेना पक्षावर सरकार कसे अन्याय करत आहे याचा पाढाच भास्कर जाधव यांनी सर्वांसमोर वाचला. आपल्या भाषणातून त्यांनी सरकारच्या हुकूमशाहीचा, मनमानी कारभाराचा निषेध केला. इतर मान्यवरांनीही भाषण करून आपला निषेध यावेळी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना नेते अरविंद सावंत,शिवसेना नेते भास्कराव जाधव, खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ,आमदार अजय चौधरी, आमदार सुनील प्रभू, आमदार मनीषा कायंदे, आमदार विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, विनोद घोसाळकर, सुभाष भोईर, जिल्हाप्रमुख केदार शिंदे, बबनदादा पाटील, विट्ठल मोरे, द्ररकानाथ भोईर, शिरीष घरत, उपनेत्या अनिता बिर्जे, महिला जिल्हाप्रमुख सुवर्णा जोशी, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, विधानसभा संघटक देवीदास पाटील, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, रघुनाथ पाटील, उपसभापती हिराजी घरत,पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, उपतालुकाप्रमुख जयवंत पाटील, प्रदीप ठाकूर, कमलाकर पाटील, उपजिल्हासंघटिका ममता पाटील, तालुका संघटिका सुजाता गायकवाड, भावना म्हात्रे, नगरसेविका वर्षा पठारे, शहर संघटिका मेघा मेस्त्री, वंदना पवार, श्रध्दा सावंत, मुमताज भाटकर, रुबिना कुट्टी यांच्यासह उरण विधानसभा मतदारसंघातील सर्व आजी-माजी शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.उपस्थित नेत्यांनी यावेळी तडीपार मोर्चाचे आयोजन करून सरकारच्या दडपशाहीचा, हुकूमशाहीचा निषेध केला.