शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर

0

शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब, एकूण १७ उमेदवारांची नवे जाहीर List of Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Lok Sabha candidates announced

कोपरगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी आज दिनांक २७ मार्च रोजी जाहीर करण्यात आली . शिवसेनेत पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर अनेक नव्या-जुन्या चेहऱ्यांना संधी देताना पक्ष नेतृत्वाला चांगलीच तारेवरची कसरत करावी लागलेली दिसत आहे. यामध्ये अनेकदा पक्षातूनच मोठा विरोध होऊनही शिर्डी लोकसभेतून खासदार राहिलेले भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेद्वारी जाहीर झाल्याने त्यांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला आहे. तर हातकणगलेच्या जागेवर शिवसेनेने बाहेरून पाठींबा जाहीर करण्यात आला आहे.

पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत सांगितले की हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. १७ जणांची नावे असलेली यादी आणि मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातील उमेदवाराची वेगळी घोषणा यावेळी करण्यात आली. शिवसेना एकूण २२ जागांवर लढणार असून उर्वरित जागेवरील नावेही लवकरच जाहीर करण्यात असेही सांगितले आहे. तसेच महाविकासआघाडी मध्ये जगावाटपावरून कोणतेही वाद नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय वंचित बहुजन आघाडी सोबत आमची चर्चा चालू असून त्यांना ५ जागा देण्याची चर्चा सुरु असून त्यासाठी सहयोगी पक्षही सहमत आहेत.

कांग्रेसकडून सांगलीसाठी उमेदवार जाहीर केला जाईल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी याआधी म्हटलं होतं. पण तिथून ठाकरे गटाने महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाण्यातून राजन विचारे, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, परभणीतून संजय जाधव, उस्मानाबाद (धाराशिव)मधून ओमराजे निंबाळकर, सिंधुदुर्ग मधून विनायक राऊत या खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मुंबईतील दोन जागांवरही काँग्रेसने दावा केला होता. पण तिथेही ठाकरे गटाने अमोल किर्तीकर आणि अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

आज मुंबईतून अमोल किर्तीकर यांचे नाव जाहीर करणाच्या काही वेळेआधीच इडीने समन्स बजावण्यात आले असून त्यांना आजचा हजर राहण्याचे आदेश यात देण्यात आले. त्यांच्यावर कोरोना काळामध्ये खिचडी वाटपामध्ये मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला असून केंद्र सरकारकडून विरोधी पक्षांवर दबाव तंत्राचा वापर सुरु असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here