उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )
केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या बोल घेवड्या घोषणांचा पडदा फाश करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने होऊ द्या चर्चा Shiv Sena’s ‘Hoo Dya Charcha’हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबवले जात आहे. या अभियानामध्ये गॅसचे दर, पेट्रोल, डिझेलचे दर,महागाई, जीवनावश्यक वस्तूंचे, गगनाला भिडलेले दर व केंद्र व राज्य शासनाने केलेल्या फसव्या घोषणांचा पडदा फाश करण्यात येत आहे, याचाच एक भाग म्हणून शिवसेना उरण तालुक्याच्या करंजा विभागातर्फे करंजा नाका भवानी चौक येथे हे अभियान राबवण्यात आले .
यावेळी उपतालुका संघटक के.एम.घरत तसेच माजी विभागप्रमुख माजी सरपंच के.एल.कोळी यांनी केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या या बोल घेवड्या योजनांचा पडदा फार्श केला. सदर कार्यक्रमास चाणजेचे सरपंच अमिताभ भगत, माजी सरपंच व विद्यमान सदस्य मंगेश थळी,करंजा शाखाप्रमुख रोहिदास म्हात्रे, उपशाखाप्रमुख राजू पाटील, परेश थळी. चंदन कोळी व ग्राम पंचायत विद्यमान सदस्य व्यंकटेश म्हात्रे, युवा सेना अधिकारी महेश पाटील, संदेश म्हात्रे , माजी ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ पाटील, व शिवसैनिक नंदकुमार चव्हाण,हरेश पवार , रविंद्र थळी,जनार्दन पाटील, चंद्रकांत थळी, नरेश ठाकूर, प्रकाश थळी, कल्पेश भोईर, रोशन भोईर,नितेश पाटील ,विजय म्हात्रे, महेश पाटील, कैलास म्हात्रे , राजदीप म्हात्रे, सर्व शाखाप्रमुख,उपशाखाप्रमुख,गटप्रमुख, बूथप्रमुख, युवासेना पदाधिकारी, व शिवसैनिक उपस्थित होते.