शिवसेना- युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा उरण दौरा.

0

उरण दि १३(विठ्ठल ममताबादे ) : उरण विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिक पदाधिकारी हितचिंतक यांच्याशी संवाद साधण्यासाठी शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे साहेब उरण दौऱ्यावर येत आहेत.मंगळवार दि. १६ जुलै २०२४ रोजी सायं. ४ वा. जे.एन.पी.टी. मल्टीपर्पज हॉल येथे होणाऱ्या शिवसंवाद मेळाव्यासाठी तमाम शिवसैनिक, हितचिंतक, शिवसेना पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी केले आहे.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, उरण येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीला उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, माजी सभापती विश्वास म्हात्रे, उपजिल्हासंघटिका ममता पाटील, युवासेना उपजिल्हाअधिकारी  नितेश पाटील, उरण शहरप्रमुख  विनोद म्हात्रे, तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी महिला आघाडी, पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here