शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची व महिला आघाडी पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. 

0

बारामती: “रुग्ण सेवा हिच ईश्वरसेवा” या प्रेरणेने प्रेरीत असलेल्या बारामती तालुक्यातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व महिला आघाडीच्या पदाधिकारी यांची बैठक  दि 31/12 /2023 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृहात बारामती येथे संपन्न झाली. या बैठकीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्याचे कक्ष प्रमुख रामहरी राऊत तसेच महाराष्ट्र राज्याचे संपर्कप्रमुख गणपती कांबळे यांच्या उपस्थितीत पार पडली.  या बैठकीदरम्यान बारामती तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या नियुक्ती करण्यात आल्या, 

यावेळी शिवसेना वैद्यकीय उपजिल्हा कक्ष प्रमुख सतीश गावडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष बारामती तालुका समन्वयक मंगेश खताळ बारामती मेडिकल सेलचे अध्यक्ष संतोषराव गोलांडे उपस्थित होते. याप्रसंगी महिला पदाधिकारी डोंबाळे मॅडम, काळे मॅडम, तसेच इतर सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना रामहरी राऊत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली. यावेळी डॉ.जडे, पुष्पाताई जडे, गौरीताई कदम, निलेश गजरमल, प्रवीण माकर, अनिल काळे, गौरी भोसले, सखाराम जठार, रूपाली जठार, सुरेश गदादे, जयश्री क्षीरसागर, अक्षता माने, दिपाली मेहता, पल्लवी चव्हाण, यांनाही नियुक्ती पत्र देण्यात आली. सर्वच नवनिर्वाचितांचे शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here