शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या वतीने काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन

0

वेवला प्रतिनिधी : शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल ता येवला जि नाशिक आयोजित शहादू शिवाजी वाघ राज्यस्तरीय स्मृती चौथ्या साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने *राज्यस्तरीय काव्यवाचन* स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. राज्यभरातील कवींनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा संजय शहादू वाघ यांनी केले आहे.

*स्पर्धेचे नियम व अटी पुढील प्रमाणे*.

१. *काव्यवाचन स्पर्धेची नाव नोंदणी दि. १५ एप्रिल २०२५ पर्यंत sswpunyasmaran2025@gmail.com  या ईमेल वर पुर्ण नाव व पत्ता असलेली फक्त एकच कविता पाठवून नोंदणी करावी.*

२. *काव्यवाचन स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.*

३. प्रथम नोंदणी केलेल्या कवितांना फक्त *दुपारी बारा* वाजेपर्यंतच काव्यवाचन स्पर्धेत संधी दिली जाणार आहे. स्पर्धक संख्या आणि वेळ शिल्लक असल्यास इतर कवितांना संधी दिली जाईल 

४. दिलेल्या तारखेच्या नंतर आलेल्या कविता ग्राह्य धरल्या जाणार नाही. ईमेल प्राप्त झाल्यावर संबंधित कवीला कळविण्यात येईल.

५. नोंदणीसाठी कविता टेक्स्ट मेसेज स्वरूपात पाठवावी. पीडीएफ, जेपीजी, अथवा फोटो टाईपमध्ये, अथवा कागदाच्या पानावर लिहून तो कागद पाठवू नये अशा कविता बाद केल्या जातील 

६. कविता एकदा पाठवल्यास दुरूस्ती करून पुन्हा पाठवू नये अथवा दोन कविता पाठवू नये असे केल्यास त्या स्पर्धकाला संधी दिली जाणार नाही, नंबर बाद केला जाईल.

७. कविता जास्तीत जास्त २० ओळींची असावी. त्यापेक्षा जास्त ओळीची कविता बाद केली जाईल.

८. सामाजिक, नैसर्गिक, कौटुंबिक, आई-बाप अशा आशयाच्या कविता स्वागतार्ह आहेत. जातीयवादी, राजकीय विडंबन, व्यक्ती चारित्र्यहनन करणा-या कविता बाद केल्या जातील. 

९. *ज्या कविता नियमबाह्य असतील, बाद झालेल्या असतील अशा कवितांचा नंबर यादीतून काढून  त्यानंतरच्या आलेल्या कवितांचा नबर पहिल्या तीस मध्ये ग्राह्य धरला जाईल*. 

१०. प्राप्त ईमेलच्या वेळेनुसार कवितांचा अनुक्रम लावण्यात येईल त्याला क्रमांक दिला जाईल.

११. आपण नोंदणी केलेल्या एकाच कवितेच्या चार प्रती टंकलिखित करून काव्यवाचन करतेवेळी परिक्षकांकडे सुपूर्द कराव्यात, जी कविता पाठवली आहे त्याच कवितेचे वाचन करावे लागेल.

१२. *काव्यवाचन स्पर्धा दि. ४ जून २०२५ रोजी सकाळी नऊ (९) वाजता सुरु होऊन दुपारी बारा (१२) वाजेपर्यंत असेल.*

१३. काव्यवाचन स्पर्धेस सकाळी आपण हजर असल्याची नोंद करावी, जेणेकरून आपले नाव पुकारले असता आपणास त्वरित कविता सादर करता येईल. एकदा नाव पुकारल्यानंतर स्पर्धक गैरहजर असल्यास पुन्हा यादीत नाव घेतले जाणार नाही 

१४. काव्यवाचन स्पर्धेचा निकाल त्याच दिवशी म्हणजेच *दि. ४ जून २०२५* रोजी दुपारी कार्यक्रम स्थळी पुरस्कार वितरण सोहळ्यात जाहीर केला जाईल व तेथेच पुरस्कार दिले जातील .

१५. काव्यवाचन स्पर्धेस येणा-या कोणत्याही कवीला प्रवास खर्च दिला जाणार नाही. स्वखर्चाने यावे लागेल. मात्र येणाऱ्या प्रत्येक साहित्यिकाला चहा, नाष्टा व दुपारी जेवण दिले जाईल 

* मुक्कामास येणा-या फक्त स्पर्धकास राहण्याची व्यवस्था एकाच ठिकाणी केली जाईल. महिला व‌ पुरूष वेगळी व्यवस्था असेल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here