शेतकरी पुत्र डॉ. बिपीन व डॉ. अनिकेतचा सावरगावला गौरव!

0

येवला, प्रतिनिधी 

 गुणवत्ता असली की स्वप्नपूर्ती सहज साध्य होते हे सिद्ध करत तालुक्यातील गारखेडा व नागडे या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी एमबीबीएसला प्रवेश मिळवत हे शिक्षण प्रथम श्रेणी उत्तीर्ण केले आहे.या यशाबद्दल बिपिन व अनिकेत या डॉक्टरांचा सावरगाव येथे माजी आमदार मारोतराव पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

दुष्काळी तालुका असल्याने ग्रामीण भागात शेतीशिवाय पर्याय नाही,त्यामुळे नवीन पिढी शिक्षणाला विशेष प्राधान्य देत असल्याने अनेक विद्यार्थी उत्तुंग भरारी घेताना दिसत आहेत.

नागडे येथील प्रगतशील शेतकरी आप्पासाहेब साताळकर यांचे चिरंजीव बिपीन साताळकर यांनी बारावी सायन्सनंतर कोटा येथे तयारी करत नीटच्या परीक्षेत टॉपला येऊन जळगाव येथील उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळविला होता.मुळातच हुशार असलेल्या बिपिन यांनी चार वर्षे कठोर मेहनत घेऊन ६० टक्के मिळवत एमबीबीएसची पदवी नुकतीच संपादन केली आहे.

तसेच गारखेडे येथील प्रगतिशील शेतकरी आप्पासाहेब खैरनार यांचे पुतणे डॉ.अनिकेत खैरनार यांनीही नीट मध्ये चांगले गुण मिळवत सोलापूर येथील डॉ.वि.एम. मेडिकल कॉलेज प्रवेश मिळविला होता.त्यांनीही सातत्य पूर्व मेहनत घेऊन ६० टक्के गुण मिळवत एमबीबीएस मध्ये यश मिळविले आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील असूनही या विद्यार्थ्यांनी घेतलेली गरुडझेप इतरांसाठी आदर्शवत असल्याचे सांगत माजी आमदार मारोतराव पवार यांनी या डॉक्टरांचा सत्कार करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. या विद्यार्थ्यांची जिद्द कौतुकास्पद असून व वैद्यकीय क्षेत्रात ते यशस्वी होऊन चांगली सेवा तालुक्यातील गोरगरीब जनतेला देतील असा विश्वासही यावेळी श्री. पवार यांनी व्यक्त केला पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीराजे पवार तसेच सावरगावचे माजी सरपंच बाळासाहेब पवार यांनी देखील यावेळी त्यांचा सत्कार केला.यावेळी आप्पासाहेब साताळकर, शरद पवार,श्रावण साताळकर,विजय खैरणार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here