येवला – प्रतिनिधी :
येवला येथील शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना तातडीने मागील वर्षीच्या पिक विम्याची नुकसानीची रक्कम मिळावी यासाठी न्याय मिळावा म्हणून नायब तहसीलदार श्रीमती पंकज मगर यांना निवेदन दिले. या निवेदनात शेतकरी संघटनेने म्हटले आहे की भारत सरकारने गाजावाजा करत शेतक-यांना फक्त एक रुपयात पिक विमा सरक्षण देणार अशी घोषणा केली त्या नुसार शेतक-यांनी सरकारला एक रुपया आणि सायबर कॅफे कागदपत्रासाठी शंभर दोनशे रुपये खर्च करून पिक विमा काढला,२०२०-२४ च्या हंगामातीलरिप रब्बी पिकाचे काही भागात पाऊस झाला नाही म्हणून तर काही भागात गारपीट अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. नेहमी प्रमाणे विमा कंपन्या आणि महसूल खात्यानं पंचनाम्याचा फार्स पूर्ण केला आहे. शेतक-यांनी
शासन दरबारी आणि विमा कंपन्याचे कार्यालयात चकरा मारल्या परंतु आज पर्यंत विमा कंपन्यांनी पिकाच्या नुकसान भरपाईची रक्कम शेतक-यांना दिली नाही. ज्या भागात लाखोरुपयाचे नुकसान झाले तिथे तीन रुपये पिक विमा भरपाई दिल्याच्या बातम्या वृत्तपत्रात येऊन गेल्या आहेत.कृपया आपण संबंधित विषयांवर मंत्री मंडळात या विषयावर चर्चा करून शेतक-यांना न्याय मिळवून द्यावा व नियमानुसार भरपाईची रक्कम मिळवून देण्याची शेतक-यांची मागणी आहे.तसेच महिन्यात महाराष्ट्र शासनाने नविन कांदाचाळ उभारणी साठीचे अनुदान बंद केले असल्याने शेतक-यांना कांदाचाळ बांधणे अशक्य होणार आहे. महाराष्ट्र शासनाने सदर आदेश तातडीने मागे घ्यावाअशी शेतक-यांची मागणी आहे.
शेतक-यांना मोफत वीज पुरवठ्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने केली मात्र आतापर्यंतचे अवाजवी आणि अनैतिक विजबील विज वितरण कंपनीने आकारले ल्यामुळे थकबाकीची रक्कम अव्वाच्या सव्वा दिसत आहे. सदर थकबाकी रक्कम शेतक-यांकडून वसूल न करता वीज बीलातुन शेतक-यांची मुक्ततता करावी. आपण वरिल सर्व प्रश्नावर योग्य तो विचार करून शेतक-यांना न्याय मिळवून दद्यावा अशी शेतक-यांची मागणी आहे,
सदर निवेदन प्रत्यक्ष छगनरावजी भुजबळ याना भेटून देण्यात आले त्या प्रसंगी भुजबळांनी त्वरीत दखल घेत कृषी अधिकारी,उप विभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे,तहसीलदार आबासाहेब महाजन यांच्याशी चर्चा करून विमा कंपन्यानीच्या तालुका प्रतिनिधीशी फोनवर संपर्क केला असता नऊ कोटी रूपये शेतक-यांच्या खात्यात जमा झाले असून एकशे सदतीस कोटी रूपयांचे वाटप एक आठवड्यात केले जाईल अशी माहिती दिली.
संबंधित निवेदनाची प्रत तहसीलदार येवला,कृषी अधिकारी शुभम बेरड यांना दिली. असून निवेदनावर शेतकरी नेते संतू पाटील झांबरे,बापूसाहेब पगारे, संध्याताई पगारे बाळासाहेब गायकवाड,अरुण जाधव, सुरेश जेजुरकर, सुभाष सोनवणे,ई परसराम सोनवणे, रावसाहेब गायकवाड, आनंदा महाले, गंगाधर कदम पोपट निकम इत्यादी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.