पैठण,दिं.१७:: एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील महिन्यात शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरून नेणाऱ्या मोटार चोर टोळीला एम आय डी सी पोलिसांनी पकडले असुन आरोपींकडून पाच विद्युत मोटारी सह एक मोटर सायकल, पिकप वाहन जप्त केलं असून तीन लाख पन्नास हजाराच्या मुद्देमालासह शेवगाव येथील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून सोमवार रोजी पैठण न्यायालयाने सदर आरोपीस दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली .
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतातील विहिरीसह कॅनल वरील विद्युत मोटारीं चोरीच्या घटना झाल्या होत्या . यामध्ये कातपूर येथील एक मोटार बालानगर येथील तीन मोटार ,पैठण हद्दीतील एक मोटार चोरीला गेल्याची घटना घडली होती . पोलीस आरोपींच्या शोधक घेतला . पोलीस पेट्रोलिंग करत असताना दोन-तीन जण मोटरसायकल सोडून पळून गेले होते . या गुन्ह्यात दोन ईसारवाडी व धनगाव येथील दोन विधी संघर्ष बालका सह शेवगाव रामनगर येथील सुरेश शिंदे वय ४०वर्षे यांनी मोटारी चोरून नेल्याची खात्री पटल्यामुळे . आरोपी सुरेश शिंदे याला एमआयडीसी पोलीसानी शेवगाव येथून अटक करून त्याच्याकडून पाच मोटारी सह मोटरसायकल पिकप वाहन असा तिन लाख पाच हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास औंरगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया , पैठणचे उपविभागागीय पोलिस अधिकारी डॉ.विशाल नेहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी भागवत नागरगोजे ,बीट जमादार राहुल मोहतमल, दिनेश दाभाडे ,राजेश सोनवणे ,मिलिंद घाटेश्वर, ओम डहाळे सह आदींनी कामगिरी केली आहे .
——
फोटो : पैठण :एम आय डी सी पैठण पोलिसांनी आरोपीकडून जप्त केलेल्या मुद्देमाल सह सपोनी भागवत नागरगोजे सह पोलीस कर्मचारी .