उरण दि 6(विठ्ठल ममताबादे )उरण पूर्व विभागातील तरुणांसाठी कॉमन सर्विस सेंटर (CSC) व श्रीया फाऊंडेशन पाले यांच्या वतीने सरकारी नोकरी, महाराष्ट्र पोलीस भरती व सरळसेवा भरती पूर्व प्रशिक्षण यांचे मार्गदर्शन शिबीर श्रीया अकॅडेमी, कोप्रोली चौक, कोप्रोली येथे रविवार दिनांक 9/10/2022 रोजी दुपारी 3.00 ते 4.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे. सुशिक्षित तरुणांनी गोडाऊनच्या नोकऱ्यांमध्ये आपले शिक्षण, करियर वाया न घालवता सरकारी नोकरी कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. उरण पूर्व विभागात प्रथमच सरकारी नोकरी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे जी काळाची गरज आहे. मार्गदर्शन करण्यासाठी सलग 9 वर्ष भारताचे प्रतिनिधित्व केलेले प्रसिद्ध अँथलेटिक्स, पोलीस सबइन्स्पेक्टर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे. हे मार्गदर्शन सर्वांना मोफत आहे.तरी जास्तीत जास्त तरुणांनी व पालकांनी या सरकारी नोकरी मार्गदर्शन शिबीराचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे. कृपया मर्यादित जागा असल्यामुळे अगोदर फोन करून आपली जागा पक्की करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा :- CSC सेंटर, श्रीया अकॅडमी, आधार नोंदणी केंद्र, युनियन बँके जवळ, कोप्रोली-उरण. फोन नंबर -9004763339, 9892159495, 9930253174