श्री गंगा हॉस्पिटलमध्ये ५ व्यांदा यशस्वी किडनी प्रत्यारोपण..!

0

नांदेड – प्रतिनिधी

येथील शिवाजीनगर भागातील श्री गंगा हॉस्पिटल येथे श्रीमती सुरेखा अशोक दराडे यांना किडनी प्रत्यारोपणानंतर यशस्वीरित्या नुकताच डिस्चार्ज देण्यात आला असून श्री गंगा हॉस्पिटलच्या टिमच्या वतीने अधिक माहिती देताना सांगितले की किडनी दाता आणि रुग्ण दोघेही उत्कृष्ट क्लिनिकल स्थितीत आहेत सदरील रुग्णांस मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदतही मिळवून देत केले किडनी प्रत्यारोपणांस मोठे सहाय्य  केले आहे त्याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी मानले डॉ.शहाजी जाधव व श्री गंगा हॉस्पिटलच्या संपूर्ण टिमचे आभार मानले आहेत

किडनी डोनर व रुग्ण आदी दोघांची प्रकृती चांगली आहे. श्रीगंगा हॉस्पिटलमधील किडनी तज्ज्ञ  डॉ. शहाजी जाधव यांनी किडनी प्रत्यारोपणाबद्दल माहिती देत रूग्णास व दात्यास तयार केले आणि त्यानंतर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली यावेळी डॉ.राजीव राठोड, डॉ.शिवराज टेंगसे या किडनी तज्ञांचे विशेष सहाय्य लाभले आहे  

सौ.सुरेखा दराडे आणि त्यांच्या दात्याला आरोग्य दायी वाटचालीसाठी शुभेच्छा श्री गंगा हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आल्या आहेत या शस्त्रक्रियेसाठी डॉ. राजीव राठोड, डॉ. शिवराज टेगसे, डॉ. प्रमोल हंबर्डे, डॉ. शहाजी जाधव, डॉ. जयश्री कागणे, डॉ. अंजली गोरे, डॉ. पवन, डॉ. सतीश राठोड, डॉ. सोनाली राठोड यांच्यासह डॉ राजेश्वर पवार डॉ. विजय कांगणे, डॉ. संदीप गोरे, डॉ. लक्ष्मीकांत भोपळे, डॉ. मनीषा मुंडे, डॉ. सूचिता पेक्केमवार, डॉ. नामदेव चौरे, डॉ. चंदू पाटील आदींनी प्रयत्न केले

किडनी प्रत्यारोपण सुरक्षित उपाय…!

आजच्या अत्याधुनिक काळात सुरक्षित किडनी प्रत्यारोपण ही एक रुग्णांना यशस्वी ठरणारी शस्त्रक्रिया ठरत असून मागील पाच महिन्यात श्रीगंगा हॉस्पिटल येथे पाच किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या करण्यात आले या सर्व रुग्णांची व किडनी दात्यांची दैनंदिन जीवन क्रम हा सुस्थितीत सुरू असून किडनी प्रत्यारोपण किडनी दात्यांनी व रुग्णांनी समोर येऊन उपचार करून घेतले पाहिजे आज आमच्याकडे हायरिस किडनी प्रत्यारोपण करण्यात येते ज्यामध्ये विभिन्न रक्तगट व एकच रक्तगट असलेल्या रुग्णांची ही या ठिकाणी किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या केल्या जाऊ शकते ..

डॉ. शहाजी जाधव ,किडनी प्रत्यारोपण तज्ञ ,

श्री गंगा हॉस्पिटल, नांदेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here