श्री गंगा हॉस्पिटल येथे भिन्न रक्तगटाचे यशस्वी किडनी प्रत्यारोपण…!

0

नांदेड प्रतिनिधी 

मूत्रपिंड (किडनी ) दाता असतानाही अनेकदा  रक्तगट जुळत नसल्यामुळे रुग्णाला डायलिसिस वर जीवन जगावे लागत असे, परंतु आता नवे नंत्रज्ञान व औषधोपचारांमुळे भिन्न रक्तगट असले तरी किडनी प्रत्यारोपण होत आहे.अशाच प्रकारचे भिन्न रक्तगट असलेले किडनी प्रत्यारोपण नांदेड येथील  शिवाजीनगर श्री गंगा हॉस्पिटल येथे किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ.शहाजी जाधव यांनी यशस्वी रित्या केले आहे 

ओम तिरुपती पवार यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या मुळे मागील ३ महिन्यापासून तो डायलिसिस वर होता. ओम च्या आई ने किडनी देण्यासाठी पुढाकार घेतला. परंतु ओम चा रक्तगट ओ (o+) आणी आई चा रक्तगट ए (A+) होता.श्री गंगा हॉस्पिटल येथील किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. शहाजी जाधव सांगितले  की ओ (o) रक्तगट असलेला यक्ती फक्त ओ (o)  रक्तगट असलेल्या यक्तीची किडनी स्विकारू शकतो .अशा वेळी किडनी  प्रत्यारोपण करायचे असेल तर रुग्णाच्या शरीरातील किडनी दात्याच्या रक्तगटाला हानिकारक असलेल्या  अँटीबोडी (anti- A/ anti-B) चे प्रमाण कमी करावे लागते.

या केस मधे ओम च्या शरीरात त्याच्या आई च्या रक्तगट विरुद्ध असलेल्या अँटीबोडी (anti-A अँटीबोडी ) प्रमाण खूप जास्त होते. किडनी प्रत्यारोपण करण्यापूर्वी अँटीबोडी चे प्रमाण कमी करण्यासाठी त्याला काही विशिष्ट प्रकारची इंजेक्शन दिले गेले आणी 6 वेळा प्लास्मा एक्सचेंज करावा लागला.अँटीबोडी चे प्रमाण सामान्य आल्यानंतर  6 ऑक्टोबर 2024 ला ओम ची किडनी प्रत्यरोपांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आणि ओम ला पुन:र्जन्म मिळून आज बुधवार दि. 16 ऑक्टोबर  2024  रोजी ओम व त्याच्या आईला हॉस्पिटल मधून सुट्टी झाली.

ओमच्या घरची  परिस्थिती अत्यंत हलाखीची होती आणी किडनी प्रत्यरोपणासाठी लागणारा खर्च त्यांना झेपणारा नव्हता. म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे ओमच्या किडनी ट्रान्सप्लांट साठीच्या खर्चासाठी सर्व समाज बांधवांनी दहा रुपयापासून ते हजार रुपयांपर्यंत सढळ हाताने सर्वांनीचं ओम च्या उपचारासाठी मदत केली यासाठी लोकांचा चांगला प्रतिसाद तर मिळालाच पण श्री गंगा हॉस्पिटल मधील संचालक व डॉक्टर यांनी सुद्धा सदर रुग्णास शक्य तेवढी मदत केली व ओमच्या पाठीशी भक्कमपणे उभा टाकले.

त्याप्रसंगी ओम च्या कुटुंबियांनी श्री.गंगा हॉस्पिटल मधील  सर्व टीम चं तसेच विशेष करून डॉ. शहाजी जाधव, डॉ. राजीव राठोड डॉ. शिवराज टेंगसे, भूल तज्ज्ञ डॉ. पवन मल्लमवार, डॉ. अंजली गोरे, डॉ. जयश्री कागणे.डॉ.संदीप गोरे, डॉ. लक्ष्मीकांत भोपळे, डॉ. विजय कागणे, डॉ. राजेश्‍वर पवार यांचे आभार व्यक्त करून त्यांचा सत्कार केला  यावेळी ओम चे वडिल तिरुपती पवार यांनी श्री. गंगा हॉस्पिटल मधील डॉ.च्या सर्व टीमचे व सर्व समाज बांधवांचे मन:पूर्वक आभार मानले आणि वरील सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here