नगर – मुखात विठूरायाचा नामघोष, टाळ-मृदुंगाचा गजर विठ्ठल-रुख्मिणीच्या वेशभुषेत विद्यार्थी- विद्यार्थीनी बाल वारकरीच्या समवेत निघालेली दिंडीने संपूर्ण निर्मलनगर परिसर भक्तीमय झाला होता.
डोके विद्या मंदिरमध्ये सांप्रदायिक दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांना वारीचे महत्व, विठ्ठल-रुख्मिणीचे सत्व समजण्यासाठी डोकेनगर येथील श्री साई विद्यालय व सौ.लक्ष्मीबाई शांताराम डोके विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सांप्रदायिक पायी दिंडी सोहळा आयोजित केला होता.
निर्मलनगर येथील विठ्ठल मंदिरात या दिंडीची सांगता झाली. यावेळी श्री साई विद्यालयाचे मुख्याध्यापक संभाजी पवार, डोके विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका रिबेका क्षेत्रे, आशा धामणे, सुजाता कर्डिले, ज्योती पवार, मंजु नवगिरे, संजोग बर्वे, मंदाकिनी पांडूळे आदिंसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा दिंडी सोहळा यशस्वीतेसाठी श्रीमती देशपांडे, श्रीमती राऊत तसेच शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.