पुसेगाव दि.21 : पुसेगाव येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराज यांच्या 77व्या पुण्यस्मरणानिमित्त मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी बॅड महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे मठाधिपती 108 परमपूज्य सुंदर गिरीजी महाराज व देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव यांनी दिली असून राज्यातील मानांकित बँड पथक यामध्ये सामील होणार असून नागरिकांनी ग्रामस्थांनी या बँड पथकाचा सुमधुर कलेचा आनंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
श्री सेवागिरी महाराज यांचे पुण्यस्मरणा निमित्त बॅड महोत्सवाचे हे द्वितीय वर्ष आहे. मंगळवार दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता या बँड महोत्सवाच्या आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील क्लोरोनट ( कलाट), ट्रंपेट, सेक्सोफोन, ढोल ड्रम, एपोनियाम ( मोठा बाजा) या माध्यमातून कलाकारांना व्यासपीठ मिळावे पारंपारिक व बँड कलेचे जतन व्हावे यासाठी तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या बँड महोत्सवामध्ये कर्नाटक सह महाराष्ट्र राज्यातील बँड पथके उपस्थित राहणार आहेत. त्यात मुख्यत्वे सिद्धेश्वर ब्रास बँड कागवाड कर्नाटक, श्री नरसिंह सरस्वती ब्रास बँड नरसिंहवाडी, अनमोल ब्रास बँड बीड, अमर ब्रास बँड बारामती, राजकमल ब्रास बँड मडगाव गोवा, नटराज ब्रास बँड बारामती, झंकार ब्रास बँड किल्ले मच्छिंद्रगड सांगली, जिजामाता प्रोफेशनल ब्रास बँड लाटे, बिस्मिल्ला ब्रॉस बँड कराड, हनीफ ब्रास बँड किन्हई, अमोल ब्रास बँड पुसेगाव, आणि शशिकांत ब्रास बँड पुसेगाव सहभागी होणार आहेत.
या महोत्सवास सर्व अटी व नियम तसेच वेळेनुसार कार्यक्रमात बदल केला जाईल. हे येणाऱ्या बँड पथकावर बंधनकारक राहील तसेच बँड कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी श्री सेवागिरी महाराज कला जीवन पुरस्कार श्री मगबुल इनामदार गुरुजी ट्रंपेट वादक, खातगुण तालुका खटाव व श्री सदाशिवराव जाधव क्लोरोनेट वादक लोधवडे तालुका माण यांना प्रदान करण्यात येणार आहे. याचबरोबर बँड कला वृद्धिगत होण्यासाठी अग्रक्रमाने कलेची जोपासना करणाऱ्या नवोदित बँड कलाकारांचा विशेष सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. हा महोत्सव 2 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता सातारा पंढरपूर रोड यात्रा स्थळ कबड्डी मैदान पुसेगाव येथे घेण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानचे विश्वस्त रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव,संतोष वाघ,गौरव जाधव, व सचिन देशमुख यांनी दिली आहे.