तृतिय वर्षातच विध्यार्थ्यांच्या हातात नोकरीचे नेमणुक पत्र
कोपरगांव: ‘सेलेबल टेक्नाॅलाॅजी प्रा. लि. ही मायक्रोसाॅफ्ट गोल्ड पार्टनर कंपनी असुन जगभर या कंपनीच्या शाखा आहेत. डेटा सायन्स अँड क्लाऊड क्षेत्रात नवोदित अभियंत्यांची आम्हाला गरज आहे. त्यासाठी आम्हीच अगोदर प्रशिक्षण देतो व त्यातुन इंजिनिअर निवडतो. त्यासाठी आम्ही कोणत्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आधुनिक तंत्रज्ञान शिकविले जाते याचा अभ्यास केला. त्यानुसार संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड केली. पहील्याच फेज मध्ये आम्हाला तब्बल ७५ विद्यार्थी मिळाले, कारण येथे विद्वत्ता व गुणवत्ताधारक शिक्षण दिले जाते’, असे प्रतिपादन सेलेबल टेक्नाॅलाॅजीचे हेड कॅम्पस रिक्रुटर (एल अँड डी) शार्थक अचार्जी यांनी केले.
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय व सेलेबल टेक्नाॅलाॅजी प्रा. लि. यांच्यात परस्पर सामंजस्य करार होवुन कंपनी प्रायोजीत ‘सेंटर ऑफ एक्सलंस’ या आधुनिक संगणकिय प्रयोगशाळेचे उद्घाटनही झाले. तसेच तृतिय वर्षातच असतानाच प्रथम ट्रेनिंग व नंतर नोकरीसाठी निवड झालेल्या ७५ आधुनिक तंत्रज्ञान अवगत प्राप्त विध्यार्थी व त्यांच्या भाग्यवान पालकांचा नेमणुक पत्र देऊुन सत्कार करण्यात आला. या संयुक्तीक कार्यक्रमात अचार्जी बोलत होते. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, कंपनीचे असोसिएट एचआर साहील बागवान, स्ट्रॅटेजिक हेड डाॅ. शांतम शुक्ला, चिफ टेक्निकल डायरेक्टर विजय नायडू, डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर, काॅम्प्युटर विभागाचे प्रमुख डाॅ. डी. बी. क्षिरसागर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन डाॅ. व्ही. एम. तिडके, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट विभागाचे समन्वयक प्रा. अतुल मोकळ व्यासपीठावर उपस्थित होते.
डाॅ. क्षिरसागर यांनी सर्वाचे स्वागत केले. ते म्हणाले की निवड झालेले सर्व विध्यार्थी हे सर्वच शाखांमधील असुन त्यांना कंपनीने पुरस्कृत केलेल्या सेंटर ऑफ एस्कलन्स मध्ये त्यांचा अंतिम (चौथ्या ) वर्षाचा अभ्यासक्रम शिकत असतानाच पुढचे कंपनीचे प्रशिक्षण घ्यायचे आहे. प्रशिक्षणा दरम्यान या विध्यार्थ्यांना पहिले चार प्रति महिना रू ५,०००, पुढचे चार प्रति महिना रू १०, व शेवटचे चार प्रति महिना रू १५,००० स्टायपेंड मिळणार आहे. व त्यानंतर कंपनीत रूजु झाल्यावर वार्षिक पॅकेज रू ५. ५ लाख ते रू ८ लाख मिळणार आहे.
डाॅ. ठाकुर यांनी सर्व विभागातील पदवी, पदव्युत्तर पदवी व पीएच. डी. सेंटर्स बध्दल माहिती दिली. ज्या विध्यार्थ्यांची सध्या निवड झाली नाही, त्यांना पुन्हा संधी मिळणार आहे. विध्यार्थ्यांच्या या निवडीमुळे ते आता तृतिय वर्षापासूनच कमावते झाले आहे.
अमित कोल्हे यांनी सागीतले की सेलेबल टेक्नाॅलाॅजी या कंपनीचे देशातील अनेक विद्यापीठे, अभियांत्रिकी महाविद्यालये यांचेशी टायअप आहे. तरी देखिल या कंपनीने संजीवनी सारख्या ग्रामिण भागातील अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड करून येथे सेंटर ऑफ एक्सलन्सची उभारणीही केली. माजी मंत्री कै. शंकरराव काल्हे यांचे नेहमीच सांगणे असायचे की आपली मुलं शिकली पाहीजे, इंडस्ट्रीला जे अभिप्रेत आहे, ते आपण विध्यार्थ्यांना शिकविले पाहीजे. हे साध्य करण्यासाठी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय ऑटोनॉमस संस्था असल्यामुळे इंडस्ट्रीला अभिप्रेत असणारे विषय आपण अभ्यासक्रमात सामाविष्ट करू शकलो , आणि त्याची फल निष्पत्ती म्हणुन २०२१-२२ च्या अंतिम वर्षातील विध्यार्थ्यांना आपण नामांकित कंपन्यांमध्ये उच्चांकी नोकऱ्या देवु शकलो. आता तर संस्थेच्या इतिहासात प्रथमच तृतिय वर्षातील विध्यार्थ्यांची निवड झाली आहे. कै. कोल्हे यांनी प्लेसमेंट (नोकऱ्या ), उच्च शिक्षण व स्पर्धात्मक परीक्षा आणि परदेशी भाषा या त्रीसुत्रीवर कार्य करण्याचे सांगीतले होते. या अनुषंगाने नितिनदादा कोल्हे व बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य चालु असुन हे महाविद्यालय ग्रामिण महाराष्ट्रातील सर्वात जास्त नोकऱ्या मिळवुन देणारे महाविद्यालय ठरले आहे, संस्थेने सात परदेशी विद्यापीठांबरोबर करार केले आहे, तेथे संजीवनीचे विध्यार्थी उच्च शिक्षणासाठी जातात, तसेच स्पर्धात्मक परींक्षांचे मार्गदर्शन घेत अनेक विध्यार्थी युपीएससी, एमपीएससी व तत्सम परीक्षा देवुन सरकारी अधिकारी बनले आहे. सदर प्रसंगी अनेक पालकांनी संजीवनी प्रती कृतज्ञता व्यक्त केली. प्रा. अतुल मोकळ यांनी आभार मानले.
फोटो ओळीः सेलेबल कंपनीचे शार्थक अचार्जी, अमित कोल्हे व इतरांसमवेत सेलेबल टेक्नाॅलाॅजी मध्ये निवड झालेले विध्यार्थी.