येवला सुरेगाव रस्ता (बातमीदार) :
बुद्ध कबीर तुकोबा च्या पासून सुरू झालेला सामाजिक प्रबोधन विचार कार्याचा वारसा हा खऱ्या अर्थाने मानव केंद्रित असून माणसाच्या तमाम प्रकारच्या गुलाम मानसिकतेची कोंडी फोडण्याचं काम व समस्त मानवाला समता न्याय स्वातंत्र्य बंधुता मानवता वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचे काम संत सुधारकांनी केले असून संत विचारच माणुसकी जिवंत ठेवतील असे विचार गाथा परिवाराचे प्रवर्तक तथा प्रचारक उल्हास पाटील यांनी व्यक्त केले.
समता प्रतिष्ठान संचलित समता माध्यमिक विद्यालय सुरेगाव रस्ता येथे गाथा परिवार प्रचार प्रसार व संत सुधारकांच्या विचारांचे महत्त्व शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सांगून तुकोबारायाच्या अभंगाचे गाथेचे महत्व पटवून देण्याच्या हेतूने आज येथील समता विद्यालयात त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते . कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी राष्ट्रसेवादल लाचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष तथा समता प्रतिष्ठानचे सरचिटणीस दिनकर दाने होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुखदेव आहेर हे उपस्थित होते. प्रारंभी संत तुकारामांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून उल्हास पाटील व उपस्थित मान्यवर यांनी अभिवादन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शरद शेजवळ यांनी केले. समाजाला अंदरुढी परंपरा देव भोळेपणा व चमत्कार यापासून संतांनी वाचवले असून आपल्या सदसद विवेक बुद्धीचा वापर करून आपला जीवन प्रवास कसा करावा याविषयी तेराव्या शतकात पासून मोठ्या प्रमाणात संतांनी एक ईश्वरवाद अधोरेखित करून समस्त लोकांना अंधरुडी ओम हवन पूजा आरशा यातून बाहेर काढून खऱ्या अर्थाने स्वतःच्या मेंदूचा वापर करण्यास प्रवृत्त केले. संतांनी संत विचार अभंग वाणीतून लोकांना शहाणं सद्बुद्ध केलं आहे असे मत यावेळी उल्हास पवार यांनी व्यक्त केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक जी एल जाधव हरिभाऊ भागवत विनोद सोनवणे बाबासाहेब कोविंद लक्ष्मण दाणे आधी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार बाबासाहेब गोविंद यांनी मानले.