विटा : सरकारने मराठ्यांच्या सगेसोयरे आरक्षणाचा निर्णय घेऊ नये अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा ओबीसी व्हिजेएनटी बहुजन परिषदेचे सचिव संग्राम माने यांनी दिला आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वत्र रान तापले आहे. त्यातच मराठा आरक्षण प्रणेते मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मराठ्यांची कुणबी म्हणून नोंद मिळेल त्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही ओबीसी म्हणून आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे ओबीसी समाजात प्रचंड नाराजी आहे.
याबाबत आज गुरुवारी विट्यात तहसील कार्यालयावर ओबीसी समाजाच्या सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चा काढला. यामध्ये संग्राम माने यांच्यासह किरण तारळेकर, माधव रोकडे, उत्तमराव चोथे, सुनील मेटकरी, किशोर डोंबे भीमराव काशीद, वैभव चोथे प्रमुख उपस्थित होते.
याबाबत तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांना एक संयुक्त निवेदन ही देण्यात आले. यात म्हटले आहे की, ओबीसी समाजाला मिळालेले आरक्षण हे सगेसोयरेंच्या मागणीमुळे जाण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकार सध्या सगेसोयरे या संदर्भात निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या संदर्भात प्रा. लक्ष्मण हाके यांनी हा सगेसोयरेबाबतचा कायदा अंमलात आणू नये. सरकारने हा कायदा आणणार ना