सहकारी संस्था मुळे तालुक्यात समृद्धी – आ.बाळासाहेब थोरात

0

थोरात कारखान्याच्या १० लाख मे टनाच्या यशस्वी गाळपाची सांगता

संगमनेर :  सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ आणि त्यांना संलग्न असणाऱ्या इतर सहकारी संस्थांमुळे  तालुक्यात समृद्धी आली असून प्रत्येक कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.राज्यातील वैभवशाली व प्रगतशील तालुक्यांमध्ये संगमनेर तालुक्याचा पहिल्या पाच तालुक्यांमध्ये नंबर लागतो.सुसंस्कृत व बंधू भावाचे राजकारण,ज्येष्ठांचा सन्मान  ही तालुक्याची परंपरा असून सर्वांनी तालुक्याच्या विकासासाठी एकत्र येऊन काम केले पाहिजे. संगमनेरचा सहकार, शिक्षण संस्था ,व्यापार ,शेती हे अत्यंत चांगले असून या चांगल्या कामाचा अभिमान बाळगताना सर्वांनी चांगल्या कामाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

              संगमनेरच्या सहकार पंढरीचा मानबिंदू असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२२ – २३ या दहा लाख मेट्रिक टना पेक्षाही जास्त यशस्वी गळीत हंगामाच्या कारखाना कार्यस्थळावर आयोजित सांगता समारंभ कार्यक्रमात आमदार बाळासाहेब थोरात बोलत होते.  अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ  होते तर व्यासपीठावर माजी आ. डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ कांचनताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, बाजीराव पा.खेमनर, रणजीतसिंह देशमुख,लहानुभाऊ गुंजाळ, आर.बी. राहणे,मिलिंद कानवडे ,व्हाईस चेअरमन संतोष हासे, ज्येष्ठ संचालक इंद्रजीत थोरात, गणपतराव सांगळे, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे ,सौ अर्चनाताई बालोडे, सौ निर्मलाताई गुंजाळ, सुनंदाताई जोर्वेकर ,घुलेवाडीच्या सरपंच सौ निर्मलाताई राऊत,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,सेक्रेटरी किरण कानवडे आदी उपस्थित होते.

           माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, निळवंडे धरण अनेक अडचणीवर मात करून आपण पूर्ण केले असून कालव्यासाठी मोठा निधी मिळवला आहे.ऑक्टोबर २०२२ मध्येच निळवंडेचे पाणी देण्यासाठी कालव्यांचे काम रात्रंदिवस सुरू ठेवले. मात्र सरकार बदलले आणि काम थंडावले आहे. मात्र कोणी कितीही अडचणी आणल्या तरी पाणी येणारच आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. कार्यक्षेत्रात एकरी ऊस उत्पादन वाढवणे अत्यंत गरजेचे असून तालुक्यातील सहकारी संस्था ,कारखाना यामुळे तालुक्यात आर्थिक समृद्धीसह प्रत्येक कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.संगमनेर तालुका हे एक कुटुंब आहे. कारखान्याने यावर्षी अनेक अडचणीवर मात करून १० लाख मेट्रिक टनाचे वर यशस्वी गाळप केले आहे. मात्र कार्यक्षेत्रात एकरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन वाढेल यासाठी आता काम करावे लागणार आहे.सहकारी संस्थांमुळे तालुक्यात समृद्धी आली असून वैभवशाली तालुक्याच्या  कामाचा अभिमान बाळगताना सर्वांनी चांगल्या कामाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहनही त्यांनी केले.

          माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, बिनचूक आणि निर्विघ्नपणे कारखान्याचा यशस्वी  हंगाम पार पडला आहे. यामध्ये कारखान्याच्या सर्व व्यवस्थापनाचा मोठा सहभाग असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करताना शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे.सहकारातूनच समाजाचे हित होत असल्याने सहकार चळवळ प्रत्येकाने जपली पाहिजे असे ते म्हणाले.आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याची यशस्वी वाटचाल सुरू असून  उपपदार्थ निर्मिती बरोबर आगामी काळात इथेनॉल निर्मितीमध्ये  साखर कारखान्याला मोठी संधी असल्याचे त्यांंनी सांगितले, चेअरमन बाबा ओहोळ म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने १२.३ साखर उतारा मिळवला असून हे सर्वांचे एकत्रित यश असल्याचे सांगून संगमनेर तालुका हा विकासात पुढे असून काही विघ्न संतोषी त्यामध्ये अडथळे निर्माण करू पाहत आहे.त्यांना जनताच उत्तर देईल असेे ते म्हणाले.यावेळी संचालक चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार , मिनानाथ वर्पे ,इंद्रजीत खेमनर ,संपतराव गोडगे, अभिजीत ढोले, भास्कर आरोटे, भाऊसाहेब शिंदे, तुषार दिघे, दादासाहेब कुटे ,विनोद हासे, अनिल काळे ,माणिक यादव ,सौ मंदाताई वाघ ,रामदास वाघ, संभाजी वाघचौरे, सौ मीराताई शेटे , सुधाकर जोशी,सुधाकर रोहम सह विविध पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले,सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर व्हाईस चेअरमन संतोष हासे  यांनी आभार मानले.

 ४ कोटी २१ लाख,कामगारांना वेतन फरक देणार
थोरात कारखान्याने सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक, यांच्याबरोबर कामगारांचे हित जोपासताना अनेक दूरदृष्टीचे निर्णय घेतले असून वेतन फरक ४ कोटी २१ लाख रुपये देण्याचा निर्णय आमदार बाळासाहेब थोरात यांनी जाहीर करताच सर्व कामगारांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here