सांगलीमध्ये चांदोली धरण परिसरात भूकंप

0

सांगली :  सांगलीतील चांदोली धरण  परिसरात बुधवारी पहाटे 4 वाजून 46 मिनिटांना 3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुदैवाने भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.
चांदोली धरण क्षेत्रात सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे 4 वाजून 46 मिनिटांना भूकंपाचा धक्का जाणवला. धक्का सौम्य असल्याकारणाने कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडलेली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावतीपासून आठ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाचा धक्का सौम्य असल्याने कसलाही धोका नसल्याचं प्रशासनानं म्हंटलं आहे. तसेच नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

भूकंप आणि पावसाचा काय आहे संबंध?

हवामान विभागाचे अभ्यासक पंजाबराव डख यांनी भूकंप आणि पावसाचा संबंध स्पष्ट करताना सांगितले की, जेव्हा भूकंपाचे धक्के जाणवतात तेव्हा जास्त पावसाची शक्यता असते. असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं आहे. काही दिवसांपूर्वीच मराठवाड्यात देखील अशाच भूकंपाची नोंद झाली आहे. परभणी, नांदेड, हिंगोली, जालना या चार जिल्ह्यांमध्ये 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला होता. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here