सांगली जिल्ह्यात सर्व व्यवहार बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

विटा : जालना लाठीचार्जच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या सांगली जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खानापूर तालुक्यात विशेष म्हणजे विटा शहरातील औषध दुकानदारांसह भाजी मंडई, किराणा, कापड, ज्वेलरी, फेरीवाले यासह खाऊ गल्लीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले.
             विट्यासह तालुक्यात कडकडीत बंद

जालना येथील अंतरवाली सराटी गावात शांततापूर्ण सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनात आंदोलकांवर पोलीस प्रशासनाने लाठी चार्ज केल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत. विट्यातही गेल्या तीन दिवसांपासून रास्ता रोको आणि बंद पाळून निषेध करण्यात आला. आज गुरुवारी जिल्हा बंदमध्येही विटा शहर आणि खानापूर तालुका सहभागी झालेला आहे. विटा आगारातील सर्व बस गाड्या काही अंशी सुरू ठेवल्या. भाजी मंडई, किराणा, कापड, ज्वेलरी, फेरीवाले यासह खाऊ गल्ली, छोटे मोठे दुकानदार, हॉटेल व्यवसायिक यांबरोबरच शहरातील मेडिकल दुकानदारांनी ही उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग घेतला आहे.
पलुसमध्ये सर्वपक्षीयच्या वतीने सरकारचा निषेध मोर्चा

पलूस : जालना येथे मराठी समाजाच्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा निषेध व मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पुकारलेल्या जिल्हा बंदला पलूस शहरासह तालुक्यात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व व्यवहार बंद ठेवून गावागावात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाजाच्यावतीने केलेल्या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यवसायिकांनी सर्व व्यवहार दिवसभर बंद ठेवले होते. पलूस शहरातून निषेध फेरी काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याशेजारी सर्व पक्षीय यांच्यावतीने सरकारचा निषेध करण्यात आला. शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. साडेचार वाजेपर्यंत पलूस बस्थानक बंद करण्यात आले आहे. बंदमध्ये सर्व पक्ष सहभागी झाले होते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते.

यावेळी नगरपरिषदेचे गटनेते सुहास पुदाले, भाजपचे रामानंद पाटील, शिव प्रतिष्ठांचे रोहित पाटील, केदार उद्योग समूहाचे अध्यक्ष सर्जेराव नलावडे, दिगंबर पाटील, शेतकरी संघटनेचे पोपट मोरे, शेतकरी कामगार पक्षाचे संग्राम थोरबोले, युवा शिवसेना जिल्हाध्यक्ष विनायक गोंदिल, संदीप सिसाळ, नगरसेवक दिलीप जाधव उपस्थित होते. तालुक्यात दुधोंडी, कुंडल, आमनापूर, बुर्ली, सावंतपूर,रामानंदनगर,अंकलखोप, आंधळी, बांबवडे, सांडगेवाडी, वसगडे, खटाव आदी गावातून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here