साई मंदिर साईनगर वहाळ येथे श्री स्वामी समर्थांच्या पादुकांच्या भाविक भक्तांनी घेतले दर्शन.

0

उरण, दि. 16 (विठ्ठल ममताबादे) श्री स्वामी समर्थांचा शिष्य परिवार महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असून भारतातील अनेक भाविक भक्त श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र अक्कलकोट येथे जात असतात. श्री स्वामी समर्थांनी 12 वर्षे वापरलेले चरण पादुकांचे महाराष्ट्रातील सर्व भाविक भक्तांना दर्शन घेता यावे यासाठी श्री स्वामी समर्थांचे पादुका साई मंदिर, साईनगर वहाळ येथे दिनांक 15/10/2022 दर्शनासाठी आणण्यात आले होते. श्री स्वामी समर्थाच्या चरण पादुकांचे दर्शन भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात घेतले. दर्शनानंतर उपस्थित असलेले माजी सभापती नरेश घरत व शेकापचे चिटणीस विकास नाईक यांचा साईमंदिर वहाळ तर्फे साई मंदिराचे संस्थापक रवीशेठ पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी रायगड भूषण राजू मुंबईकर यांच्यासह विविध मान्यवर, भाविक भक्तगण उपस्थित  होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here