सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी जिल्ह्यातील आजी माजी शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढला होता. खाजगीकरण, अशैक्षणिक काम आणि समूह शाळा या तीन प्रमुख मागण्यांसाठी शिक्षक रस्त्यावर उतरले होते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते.
या मोर्चातून सरकारने योग्य तो धडा घ्यावा आणि लवकरात लवकर कार्यवाही करावी अन्यथा भविष्य काळात हा संघर्ष आणखी तीव्र केला जाईल असा इशारा देखील या वेळी देण्यात आला. या मोर्चासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून शिक्षक मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती.
दुपारी एक वाजता जोरदार घोषणा देत हा मोर्चा पोवई नाक्यावरून निघाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर येऊन थांबला. यावेळी उपस्थित शिष्ठ मंडळांनी जिल्हाधिकारी सातारा यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
काही दिवसांपूआवी पालघरच्या जिल्हा परिषदेतील शाळेचा भोंगळ कारभार समोर आला होता. यामध्ये विद्यार्थी शाळेत पत्ते खेळताना दिसले होते. वर्गात शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना दुर्रीचा डाव मांडला होता. घटना समोर आल्यानंतर संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्यात आली होती. तसेच शाळेत दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली.