येवला (प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा वर्धापन दिन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृह येवला येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
महाराष्ट्र शासनाने 15 ऑक्टोबर 1932 रोजी सामाजिक न्याय विभाग अर्थात समाज कल्याण विभाग स्थापित केला त्याचा स्थापना दिन येथील विद्यार्थी वस्तीगृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी वाचनालय व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिकेचे संस्थापक शरद शेजवळ हे होते.
वस्तीगृहाचे अधिक्षक बी.डी खैरनार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुरेश खळे,रोहित घोटेकर उपस्थित होते.प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
सामाजिक न्याय विभाग विविध विकास योजना,उपक्रम याची माहिती यावेळी करून देण्यात आली अनुसूचित जातीच्या दुर्लक्षित वंचित घटकाला समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी परिश्रम घेण्याची गरज असून सरकारने मागासवर्गातल्या विद्यार्थी,युवक, महिला,विद्यार्थिनी,वृद्ध,शेतकरी भूमिहीन आदी घटकांसाठी सुरू केलेल्या व उपेक्षित अनुसूचित जाती समूहातील घटकांच्या विविध योजना यांची माहिती यावेळी करून देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहाचे अध्यक्ष बी.डी खैरनार सर यांनी केले तर आभार वसंत पवार यांनी मानले. कार्यक्रमाला वसतिगृहाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त अनुदानित वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मिष्ठांना भोजन देण्यात आले.