उरण दि 25(विठ्ठल ममताबादे ) सोमवार दिनांक 24/10/2022 रोजी जवाहर कोळी (बामण डोंगरी) आणि अक्षय ठाकूर (केळवणे) यांच्याकडून रा.जि.प.शाळा कडापे आणि रा.जि.प.शाळा पूनाडेवाडी येथील इयत्ता पहिली ते पाचवीच्या सर्व मुलांसाठी स्नेहभोजन, दिवाळी स्वीट शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य, यांचे वाटप करण्यात आले . विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबत सामाजिक भावनिक विकास व्हावा, आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजातील वंचित घटकासाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही भावना मुलांमध्ये रुजावी यासाठी हा उपक्रम घेण्यात आला .विशेष म्हणजे वाडीवरील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा काही वेगळाच होता.या उपक्रमासाठी कडापे शाळेचे मुख्याध्यापक हितेंद्र म्हात्रे , पुनाडे वाडी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप पाटील ,कडापे शाळेचे उपशिक्षक रमेश पाटील त्याप्रमाणे शाळा कमिटीचे सदस्य आणि विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी कडापे शाळेतील उपशिक्षक रमेश पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून जवाहर कोळी आणि अक्षय ठाकूर त्याचप्रमाणे सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.