पैठण,दिं.३०: सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता श्रेणी १ राजेंद्र बोरकर पाटील यांनी पैठण आपेगाव तिर्थक्षेत्र विकासाची कामे उत्कृष्टरित्या केल्याबद्दल त्यांचा
अभियंता दिना निमित्ताने ईन्सिटटयुशन आॅफ इमारत रेल्वे स्टेशन येथे झालेल्या कार्यक्रमात औंरगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकीर्डे यांनी सहाय्यक अभियंता श्रेणी १ राजेंद्र बोरकर यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्हसह प्रशस्तीपत्र देऊन उत्कृष्ट अभियंता म्हणून गौरव करण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबाद अंतर्गत अभियंता दिन २०२२ च्या अनुषंगाने कनिष्ठ अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य, राजपत्रित अभियंता संघटना,सरळ सेवा प्रविष्ट वर्ग १अभियांत्रिकी अधिकारी संघटना व इंडियन इंजिनियर्स फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अभियंता दिनाचा कार्यक्रम आयोजित करून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अभियंता यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यानुसार औंरगाबाद विभागातील सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचे पैठण येथील सहाय्यक अभियंता श्रेणी १ राजेंद्र बोरकर पाटील यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन अभियंता दिना निमित्त त्यांचा प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे यावेळी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबादचे कार्यकारी संचालक संजय बेलसरे, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबादचे मुख्य अभियंता दिलीप उकीर्डे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण औरंगाबादचे मुख्य अभियंता जयंत गवळी,स्वामी विष्णु पादानंदजी महाराज,मृद व जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता विश्वनाथ नाथ,लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधिक्षक अभियंता समाधान सब्बीनवार,दक्षता व गुन नियंत्रण मंडळाचे अधिक्षक अभियंता एस एस भगत, सार्वजनिक बांधकाम औंरगाबाद मंडळाचे अधिक्षक अभियंता विवेक बडे, सार्वजनिक बांधकाम मंडळ उस्मानाबादचे अधिक्षक अभियंता बी एन थोरात, औंरगाबाद पाटबंधारे मंडळचे अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे,दक्षता पथक व मंडळ औरंगाबादचे अधिक्षक अभियंता मनोज अवलगावकर,दक्षता व गुण नियंत्रण मंडळ विद्युतचे अधिक्षक अभियंता एस बी चौगुले, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण मंडळाचे वसंत गालफाडे, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबादचे उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ एस एस चौधरी, कनिष्ठ अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जयवंत गायकवाड, कनिष्ठ अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस उन्मेश मुडविद्रीकर, उपाध्यक्ष संजय भोसले, कनिष्ठ अभियंता संघटना जिल्हा सचिव शेख वहीद, विभागीय अध्यक्ष सरचिटणीस एम आय सय्यद, राजपत्रित अभियंता संघटना विभागीय सचिव अजय टाकसाळ, सदस्य रविंद्र तोंडे,सरळ सेवा प्रविष्ट वर्ग १ अभियांत्रिकी संघटनाचे सदस्य सह विविध मान्यवर उपस्थित होते.
———-
फोटो : औंरगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता श्रेणी १ राजेंद्र बोरकर यांनी पैठण आपेगाव तिर्थक्षेत्र विकासाची कामे उत्कृष्टरित्या केल्याबद्दल त्यांचा
अभियंता दिना निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकीर्डे यांनी राजेंद्र बोरकर यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्हसह प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.(छायाचित्र : गजेंद्र पाटील, पैठण)