बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धारामय्या यांनी आज (20 मे) शपथ घेतली. उपमुख्यमंत्रि म्हणून डीके शिवकुमार यांनी शपथ घेतली.
बेंगळुरूच्या कांतिरवा स्टेडिअमवर शपथविधीचा कार्यक्रम पार सुरू आहे. शपथविधीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उपस्थित आहेत. सिद्धारामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यासोबत 8 नेते कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतील. डॉ. G परमेश्वरा, K H मुनियप्पा, K J जॉर्ज, M B पाटील, सतीश जराकिहोली, प्रियांक खर्गे, रामालिंगा रेड्डी, B Z झमीर अहमद खान हे आठ जण मंत्रिपदाची शपथ घेतील.
या शपथविधीला विरोधी पक्षातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली.
- *राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
- *राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत
- *छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल
- *तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन
- *हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू
- *बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार
- *बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव
- *जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती
- *जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला
- *अभिनेते कमल हसन
- *शिवसेना खासदार अनिल देसाई
- *माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे
- *माकप नेते सीताराम येचुरी
- *भाकप नेते डी. राजा
डीके शिवकुमार की सिद्धरामय्या या दोन नावांभोवती निवडणूक निकालानंतरचं कर्नाटकचं राजकारण फिरत होतं. अखेर मुख्यमंत्रीपदी सिद्धारामय्या यांची निवड झाली आहे. काँग्रेस नेते के.वेणुगोपाल यांनी पत्रकारपरिषदेत ही घोषणा केली