कोपरगाव : येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दीपावली-पाडवा घर तेथे रांगोळी स्पर्धा २०२२ या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे जाहीर करत असल्याची माहिती परिक्षण समिती प्रमुख सौ. कल्पना हेमंत गिते यांनी दिली आहे.
सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत अ.भा.मराठी नाट्य परिषद अहमदनगर जिल्हा शाखा,बाल रंगभूमी परिषद,अहमदनगर,फोटोग्राफर असोसिएशन,कलाध्यापक संघ यांचे सहभागातून आणि विसपुते सराफ, धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म,कापसे पैठणी, पुष्पांजली शाॅपी, अग्रवाल चहा कंपनी, पांडे स्विटस्, सुशांत आर्टस् ॲन्ड पब्लिसिटी यांचे सहकार्याने सालाबादप्रमाणे परंपरेनुसार याही वर्षी दीपावली-पाडवा निमित्त ‘घर तेथे रांगोळी’ स्पर्धेचे आयोजन याही वर्षी कुठलेही प्रवेश शुल्क न आकारता भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने सहभागी स्पर्धकांच्या घरासमोरील अंगणात बुधवार दि.२६ ऑक्टोबर २०२२ रोजी परंपरेनुसार याही वर्षी दीपावली-पाडवा निमित्त ‘घर तेथे रांगोळी’ स्पर्धेचे १० व्या वर्षी आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी पारंपारिक,निसर्गचित्र,व्यक्तीचित्र, सामाजिक विषय,व्यंगचित्र असे पाच विषय ठेवण्यात आले होते.सुमारे ३२५ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.
पारंपरिक रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) उषा पंडोरे, विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) आदित्य घोरपडे,सिध्दी चौहान,विद्या खर्डेकर, गायत्री थोरात,पुष्पा खोसे, राजश्री शिंपी,शितल लोंढे,रुपाली मोरे,पायल जोशी,उषा जोशी,सारिका म्हस्के यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
निसर्ग चित्र रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) धनश्री भडकवाडे, विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) शांभवी देशमुख, रुपाली आदमाने,रेणुका भालारे,भाविका केणे, सुनिता भुतडा,वेदांगी आवारे, राजश्री मालकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
व्यक्तिचित्र रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) तेजस्विनी कुंढारे विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) रुपाली वरोडे, उमाकांत भामरे, प्रियंका सारंगधर, ऋतुजा बो-हाडे,शितल आव्हाड यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
सामाजिक विषय रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) श्रृती कानडे,विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) आरती बाविस्कर,आदिती नाईक,अर्चना मुंदडा,प्रगती गुंजाळ, दिपाली जाधव,सिमा वरखेडे,साक्षी मतकर, आरती जगताप यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
व्यंगचित्र रांगोळी प्रकारात प्रथम क्रमांक (पैठणी,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) प्राप्ती बुधवंत,विशेष गुणवत्ता रांगोळी (भेटवस्तू,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र) कल्याणी आव्हाड, कस्तुरी सोनवणे,नेतल लाहोटी यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
बक्षिस विजेत्यांचे सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके,परिक्षण सहाय्य समितीचे प्रा.अनिल अमृतकर, प्रा. अतुल कोताडे, प्रा.मतीन दारुवाला,प्रा.प्राजक्ता राजेभोसले,प्रा.ऋतुजा कोळपकर,प्रा.वंदना अलई,सूर्यतेज सल्लागार समिती व सर्व सदस्यांनी यांनी अभिनंदन केले आहे.
रांगोळी स्पर्धेच्या पाच प्रकारात प्रथम क्रमांक विजेते परिक्षण समितीच्या शिफारसीनुसार पुढील वर्षापासून संयोजन समिती व परिक्षण सहाय्यक सदस्य म्हणून कामकाज पहातील.आणि प्रदर्शनार्थ रांगोळी साकारतील.सर्व बक्षिस विजेत्यांच्या सन्मानाची दिनांक,ठिकाण आणि वेळ हे आयोजकांकडून
विजेत्यांना पत्र/मोबाईल द्वारे कळविण्यात येईल.असे सूर्यतेजचे स्पर्धा समिती यांनी कळविले आहे.बक्षीस विजेत्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.