सोनापुरला गावाला हवीत दोन उपसरपंच पदे ;ग्रामपंचातींने केला ठराव.

0

नागठाणे : महाराष्ट्र सरकारमध्ये नुकतीच दोन उप मुख्यमंत्रीपदाची नियुक्ती केल्यानंतर आता सातारा जिल्ह्यातील सोनापुर (ता.सातारा) गावानेही गावच्या विकासासाठी दोन उपसरपंच हवीत असा ठराव मासिक सभेत केला असल्याची माहिती सरपंच व सर्व सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिली.तसेच या बाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे सांगितले.

            या बाबत सोनापुर ग्रामपंचायीतर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सरपंच सुनंदा खरात माहिती देताना म्हणाल्या की, सोनापुर ही ग्रामपंचायत ग्रुप पंचायत आहे.या गावाच्या अंतर्गत निवडुंगवाडी हे गाव असून हे गाव सोनापुर गावापासून सुमारे तीन किलोमीटर डोंगरावर  आहे.या ग्रामपंचायतमध्ये नऊ सदस्य आहेत.या मध्ये सरपंच पद हे आरक्षित महिला आहे.तर उपसरपंच पदही काही महिन्यांपासून रिक्त आहे.या रिक्त झालेल्या उप सरपंच पदावर दोन उपसरपंच पदे निर्माण करावी असा मासिक सभेचा ठराव करण्यात आला आहे.परंतु असा ठराव लिहण्यास ग्रामसेवकांनी नकार दर्शवला आहे.जर महाराष्ट्र राज्याला दोन उपमुख्यमंत्री पद चालत असतील तर गावच्या विकासकामांना गती मिळण्यासाठी गावासाठी दोन उपसरपंच पदे असावी असे आमच्या सदस्यांचे मत झाले आहे.या बाबत दिलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की मी महिला सरपंच असून विकास कामांना  दोन उपसरपंच असतील तर चालना मिळेल .तरी आमच्या या ठरावा बाबत जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक विचार करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here