सोनेवाडीला स्वतंत्र महसूल मंडळ होण्यासाठी प्रयत्नशील – आ.आशुतोष काळे

0

कोळपेवाडी वार्ताहर:- दुष्काळसदृश्य व नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी सोनेवाडीला स्वतंत्र महसूल मंडळ व्हावे यासाठी प्रयत्नशील असून त्याबाबत पाठपुरावा करीत असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

 कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे ३० लक्ष १५ हजार रुपये निधीतून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये १४ व्या वित्त आयोगातुन जि.प. शाळा इमारत दुरुस्ती करणे, शाळेला वरांडा बांधणे, वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेतून समाजमंदिर बांधणे, नवबौद्ध घटक विकास योजनेअंतर्गत नगदवाडी गावठाण वस्ती सौर पथदिवे बसवणे, १५ व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा योजना सोलर पंप बसवणे, नगदवाडी येथे जि.प. शाळा संरक्षक भिंत व परिसर सुशोभीकरण करणे, जि.प. शाळा सोनेवाडी येथे संरक्षक भिंत बांधणे व मेन गेट बसवणे, पाणी पुरवठा टाकी दुरुस्ती करणे व जलशुद्धीकरण यंत्रणा बसवून पाईपलाईन करणे आदी कामांचा समावेश आहे. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, मतदार संघातील जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवून त्यांच्या विकासाच्या बाबतीत असलेल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करीत आहे. सोनेवाडी व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र महसूल मंडळ नसल्यामुळे दुष्काळसदृश्य व नैसर्गिक आपत्तीत येणाऱ्या अडचणी व त्यामुळे होणाऱ्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळत नव्हता. त्यामुळे मागील काही वर्षापासून सोनेवाडीमध्ये स्वतंत्र महसूल मंडळ व्हावे अशी मागणी पुढे आली होती. त्या मागणीचा विचार करून सोनेवाडीला स्वतंत्र महसूल मंडळ व्हावे यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावावर लवकरात लवकर मंजुरी व्हावी यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत असून लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सोनेवाडी येथील शब्बीर शेख, गणीभाई मणियार, लुकमान शेख, हमीद सय्यद व इकबाल सय्यद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांचे आ. आशुतोष काळे यांनी स्वागत केले.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर करखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, शंकरराव चव्हाण, वसंतराव आभाळे, राहुल रोहमारे, प्रविण शिंदे, विष्णू शिंदे, माजी संचालक काकासाहेब जावळे, सचिन रोहमारे, सुनील शिंदे, रोहिदास होन, सरपंच गंगाराम खोमणे, बाबुराव थोरात, सोपानराव गुडघे, भास्करराव घोंगडे, मधुकर जाधव, रावसाहेब बोंडखळ, शंकरराव जावळे, प्रल्हाद जावळे, विठ्ठल जावळे, किशोर गुरसळ, केशव जावळे, उपसरपंच किशोर जावळे, कांतीलाल जावळे, शिवाजी जावळे, नंदकिशोर औताडे, अशोक वाके, नाना माळी, यमाजी जावळे, अण्णासाहेब गाडे, संतोष गुडघे, प्रविण जायपत्रे, किरण जावळे, मिननाथ गुडघे, भाऊसाहेब माळशिखरे, शंकरराव जाधव, निरंजन जावळे, कर्णा जाधव, शिवाजी जगताप, धर्मा जावळे, गोरख पोटकुळे, बाबासाहेब गुरसळ, राजु गुडघे, साईकांत होन, राधा माळी, व्यंकट जावळे, कांतीलाल जावळे, लहानु माळी, रावसाहेब खोमणे, अनाजी जावळे, जालिंदर बोंडखळ, मनराज जावळे, गोपीनाथ जावळे, मारुती गुडघे, अहिल जावळे, रविकिरण आहेर, तुळशीदास जावळे, भाऊ जावळे, तुकाराम जावळे, धर्मा पवार, मोहन जावळे, लक्ष्मण जावळे, संतोष गुडघे, अर्जुन जावळे, मच्छिन्द्र जावळे, पांडुरंग जावळे, राणा वक्ते, भिकाजी घोंगडे, भास्कर जावळे, बापूसाहेब जावळे, कल्याण जावळे, पंढरीनाथ वायसे, प्रल्हाद जावळे, शिवाजी जावळे, चंद्रकांत मंजुळे, विठ्ठल दहे, दादासाहेब जावळे, पांडुरंग दहे, भागवत जायपत्रे, सोमनाथ जावळे, योगेश जावळे, कैलास होन, नवनाथ माळी, कर्णा जावळे, लक्ष्मण जावळे, बाळासाहेब जावळे, लक्ष्मण गुडघे, संतोष जावळे, प्रभाकर जावळे, सुरेश होन, राजेंद्र पाचोरे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, पं.स. उपअभियंता  लाटे, गायकवाड, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. बडदे, डॉ. कोल्हे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ- सोनेवाडी येथे विविध विकासकामांचे लोकार्पण प्रसंगी आ. आशुतोष काळे व मान्यवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here