नांदेड- नांदेड उत्तर विधानसभेचे अपक्ष उमेदवार मिलिंद देशमुख यांनी मतदारसंघातील सोमेश्वर, ढोकी आणि बोरगाव येथे मतदारांशी संवाद साधला. यावेळी मतदारांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत उत्तर विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपल्यासारखे सुशिक्षित आणि विकासाभिमुख नेतृत्व असलेल्या चेहऱ्याला आम्ही निवडून देऊ असा विश्वास मतदारांनी थेट उमेदवारांनाच दिला.
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार मिलिंद देशमुख यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या बळावर उत्तर विधानसभा मतदारसंघ पींजून काढला आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातही त्यांनी मतदारांशी संवाद तसेच कॉर्नर बैठकावर जोर दिला आहे. त्यांना त्यांची पत्नी माजी नगरसेविका वैशाली देशमुख आणि अन्य नातेवाईक व मित्रमंडळी खरी साथ देत आहेत.
शहरी भागातील महापालिकेच्या प्रभागनिहाय नगरांमध्ये वैशाली देशमुख आपल्या असंख्य महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदारांशी “किटली” या निवडणूक निशाणीवर मतदान करण्यासाठी आवाहन करत आहेत. तर तिकडे मिलिंद देशमुख स्वतः ग्रामीण भागात सर्वसामान्य मतदारांच्या अडचणी समस्या जाणून घेऊन मला एकदा विधानसभेत पाठवा आपल्या भागाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देत आहेत. नांदेड तालुक्यातील सोमेश्वर, ढोकी आणि बोरगाव येथे संवाद आणि कॉर्नर बैठका घेऊन मतदारांशी हितगुज केले. विशेष म्हणजे त्यांच्या समवेत ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक महिला स्वतः त्यांच्या पदयात्रेत आणि संवाद बैठकीमध्ये न बोलावता उपस्थित राहत आहेत. ज्येष्ठांचा आशीर्वाद मला या निवडणुकीमध्ये नक्कीच मिळेल असा विश्वास मिलिंद देशमुख यांना आहे, तर दुसरीकडे या भागाचा विकास करण्यासाठी सुशिक्षित आणि बुद्धिजीवी चेहरा म्हणून मतदार आपल्याकडे पाहत आहेत. आपल्या निवडणूक (किटली) निशाणीवर आम्ही कुणाच्याही आमिषाला बळी न पडता मतदान करून आपणास विधानसभेवर पाठवून आमच्या भागाची सेवा करण्याची संधी देऊ असा विश्वास ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, महिला मिलिंद देशमुख यांना देत आहेत.
कोटीतीर्थ ,थुगाव , सुगाव बु व खुर्द ,सोमेश्वर, ढोकी आणि बोरगाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात युवावर्ग आणि महिला अपक्ष उमेदवार मिलिंद देशमुख यांच्या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. यामुळे मिलिंद देशमुख यांचा उत्साह वाढत आहे. त्यांच्या प्रचाराला वेग येऊ लागला आहे. या मतदारसंघातील मतदारांनी आमचा एकच उमेदवार मिलिंद देशमुख आणि निशाणी “किटली” याशिवाय दुसरा कोणी नाही असा ठाम निश्चय करून श्री देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.