सोलापूर जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर

0

जिल्हाध्यक्ष पदी विजयकुमार बाबर यांची तर जिल्हा संघटक पदी रवि ढोबळे यांची निवड*

सोलापूर /प्रतिनिधी 

मराठी पत्रकार परिषद संलग्न  डिजिटल मीडिया परिषदेच्या सोलापूर जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांची निवडी बाबत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा डिजिटल मिडिया परिषदेचे संस्थापक एस.एम. देशमुख यांच्या सुचनेनुसार आणि डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी ( दि. ९)  रोजी ऐश्वर्या हॉटेल सोलापूर येथे बैठक घेऊन सोलापूर जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली.

या बैठकीत सर्वानुमते जिल्हाध्यक्ष पदी आज तक न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार बाबर यांची तर जिल्हा संघटक पदी जय महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे जिल्हा प्रतिनिधी रवि ढोबळे यांची निवड करण्यात आली.या निवडीचे नियुक्ती पत्र डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे आणि ज्येष्ठ पत्रकार भगवान परळीकर यांच्या हस्ते देण्यात आले.

याप्रसंगी मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी संघटनेचा उद्देश स्पष्ट करत, डिजिटल मीडिया पत्रकारांवर होणारे हल्ले व अन्याय याबाबत आवाज उठविण्याची गरज असून डिजिटल मीडिया परिषदेत काम करणाऱ्या पत्रकारांना अधिस्वीकृती मिळण्यासाठी सुध्दा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल मिडिया परिषद हवे ते प्रयत्न करणार असल्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सोलापूर डिजिटल मिडिया परिषदेत अन्य कार्यकारणी मध्ये 

उपजिल्हा संघटक :-लक्ष्मीकांत शिंदे(लोकदर्शन न्यूज चॅनल ), प्रसाद दिवाणजी – जिल्हा उपाध्यक्ष (दै.तरुण-भारत संवाद ), दीपक शिराळकर – जिल्हा उपाध्यक्ष (दै.पुढारी), विनोद ननवरे – जिल्हा उपाध्यक्ष (माझा न्यूज), अप्पा बनसोडे – शहर कार्याध्यक्ष (एबीएन न्यूज), शिलरत्न इंगळे – शहर कार्याध्यक्ष (दै.सकाळ), रत्नदीप सोनवणे – शहर सचिव (एमएच दर्पण न्यूज), वैभव गंगने – शहर सहसचिव (के.सिटी न्यूज), यासीन शेख – शहर खजिनदार (आझादी बचाव), यश गुरव – शहर खजिनदार (दै.तरुण भारत सोलापूर), अमर हुमनाबादे – शहर सहखजिनदार (जयहिंद 24), प्रमोद तुपसमुद्रे – शहर सहखजिनदार (जनताराज न्यूज), रोहन श्रीराम – (द सोलापूर टाईम्स), विक्रांत कालेकर – (इन न्यूज), शिवानंद येरटे – शहर सहसचिव (सम्यक न्यूज) आदी पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here