कोपरगांव :-दि. २९ ऑक्टोंबर २०२२
तालुक्यातील आपेगांव जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९६ लाख रूपयांचा निधी दिला यात आमदार आशुतोष काळे यांचे कुठलेही कर्तृत्व नाही. कोपरगांव विधानसभा मतदार संघातील वारी, कोळपेवाडी, कुंभारी, जेऊरकुंभारी, सुरेगांव, मळेगांवथडी, मायगांवदेवी, शिंगणापुर, रांजणगांव देशमुखसह सहा गांवे, धारणगांवसह चार गांवे या गावांच्या जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाने १९२ कोटी ४८ लाख रूपयांचा तर उर्वरीत ५३ ग्रामपंचायतीसाठी ८५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यांत तत्कालीन आमदार व भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांचाच पाठपुरावा असल्याचे बाजार समितीचे माजी संचालक अंबादास पाटोळे यांनी एका पत्रकाद्वारे प्रतिपादन केले.
आपेगांव येथे आमदार आशुतोष काळे यांनी ९६ लाख रूपये खर्चाच्या जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना कामाचे भुमिपुजन केले त्याचा निषेध अंबादास पाटोळे व त्यांच्या सहका-यांनी केला त्याप्रसंगी त्यांनी टिका केली आहे.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर जल ही योजना लोकसभा निवडणुकीपासून सुरू केली देशातील प्रत्येक गावातील नागरीक पिण्यांच्या पाण्यांपासुन वंचित रहायला नहो याची काळजी घेतली. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी दिल्ली दरबारी पंतप्रधान कार्यालयासह केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय जलसंपदा, पाणीपुरवठा मंत्री यांच्याकडे बैठका घेवुन प्रस्ताव देवुन कोपरगांव मतदार संघातील विकास कामे मार्गी लावण्यांत पुढाकार घेतला, त्यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सर्व मंत्री महोदयांनी जल जीवन मिशनसह अन्य विकास कामांना कोटयावधी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे., केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनीही कोपरगाव येथे झालेल्या भाजप कार्यकर्त्या मेळाव्यात याबाबत जाहीर खुलासा केलेला आहे.
आमदार आशुतोष काळे यांनी श्रेय जरूर लाटावे पण ते ज्या ज्या ठिकाणी उदघाटने भूमिपुजने करतात त्या त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमांतून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविला याची जाहिर वाच्यता करून त्यांचे छायाचित्र लावण्याची तसदी घ्यावी., आणि जाहिरपणे जल जीवन मिशनचा २७७ कोटी रूपयांचा विकासनिधी नेमका कसा आहे हे जनतेला सांगावे.
गेल्या अडीच वर्षात आमदार आशुतोष काळे यांनी मतदार संघात विकासाचे कुठलेही ठोस काम केलेले नाही. फक्त सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रस्ताव फाईलींचे श्रेय लाटुन त्याचीच प्रसिध्दी सुरू ठेवलेली आहे हे मतदार संघातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांना आता समजायला लागले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कोरोना आपत्तीत मंत्रालयात आलेच नाही मग विकासाचे कुठले प्रश्न मार्गी लागले असे सांगुन त्यांनी आपेगांव जलजीवन मिशन पाणी योजना कामाचे श्रेय लाटणा-यांचा निषेध केला याप्रसंगी आपेगांवच्या सरपंच सौ. मंगलताई ज्ञानेश्वर भुजाडे, उपसरपंच किसन गव्हाळे, सोसायटीचे माजी अध्यख सोपानराव गव्हाळे, आपेगांव सोसायटीचे अध्यख ज्ञानदेव , गायके, दत्तु पाटोळे, पुंजाराम शिंदे, माधव गव्हाळे, ज्ञानेश्वर भुजाडे, संजय भुजाडे, आसाराम पगारे, ग्रामपंचायत सदस्य सिताराम गोरे, दिनकर भुजाडे आदि उपस्थित नागरिकांनी निषेध केला.