उरण दि १४(विठ्ठल ममताबादे ) : राज्यात रक्ताचा होत असलेला तुटवडा, रुग्णांचे रक्ता अभावी होणारे मृत्यू आदी गोष्टी लक्षात घेउन रक्तदाना बाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने तसेच गोर गरिबांना रक्त वेळेत उपलब्ध व्हावे या अनुषंगाने स्कीमर्स फॅमिली पनवेल उरण या सामाजिक संस्थेतर्फे श्री साईबाबा मंदिर,साईनगर, वहाळ,पनवेल येथे भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी श्री साई मंदिर वहाळचे संस्थापक रवीशेठ पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत मुंबईकर, स्कीमर्स फॅमिली पनवेल उरण या सामाजिक संस्थेचे अमित पाटील,अनिकेत पवार, मनिष पाटील, आकाश कोळी, आकाश उलवेकर, प्रतीक पाटील, मंदार सुर्वे, रोशन म्हात्रे, संकेत पाटील,सचिन, विनय कोळी कौस्तुभ गोजे,जितेश म्हात्रे ,आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. ४० सदस्य असलेल्या स्कीमर्स फॅमिली या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत.
सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी भव्य दिव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे स्कीमर्स फॅमिली संस्थेचे सदस्य अमित पाटील यांनी सांगितले.या प्रसंगी उपस्थित असलेले श्री साई मंदिर वहाळचे संस्थापक रवीशेठ पाटील यांनी सदर उपक्रमांचे कौतुक करत सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी असेच चांगले कार्य पुढेही सुरु ठेवून समाजकार्य करावे असे सांगून शुभेच्छा दिल्या. एकंदरीत स्कीमर्स फॅमिली पनवेल उरण या सामाजिक संस्थेतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.