स्नेहलताताई कोल्हे यांची स्थानीक कोपरगांवच्या बाजारपेठेत खरेदी 

0

कोपरगांव :- दि. ५ ऑक्टोंबर 2022

          भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर कोपरगांवच्या स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करत व्यावसायिकांची आस्थेने चौकशी केली.

गेल्या २ वर्षापासून कोरोना महामारीमुळे सर्व सण साजरे करण्यांवर निर्बंध होते. महामारी ‘प्रत्येकाच्या घरापर्यंत आली. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी गोर-गरीब, कोपरगांव मतदारसंघ वासियांच्या अडी-अडचणी दूर करण्याची शिकवण देत ग्रामीण अर्थकारणाला सर्वोच्च प्राधान्य दिले तोच वसा आजही कायम आहे. प्रत्येकांने कोपरगांव शहर व्यावसायीकांच्या वस्तु खरेदी करून  त्यांच्या अर्थकारणाला बळ द्यावे. कोपरगावची बाजारपेठ फुलविण्यांत संजीवनी उद्योग समुहाचा सिंहाचा वाटा आहे.    

दसरा विजयाचा दिवस, दृष्ट विचारांच्या, अहंकाराचा नाश होऊन सर्वांना चांगली सुबद्धी मिळावी व स्थानिक बाजारपेठ फुलावी या हेतूने भाजपा व सर्व ज्ञात अज्ञात घटक कार्यरत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी केंद्रीय व राज्य शासनातील मंत्री सर्व घटकांच्या जीवनांत आनंदाचे क्षण निर्माण व्हावे म्हणून अहोरात्र झटत आहे असेही सौ. स्नेहलता कोल्हे शेवटी म्हणांल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here